BJP Farmer Mla Subhash Pasi Arrested  Saam Tv
मुंबई/पुणे

BJP Farmer Mla Arrested : भाजपच्या माजी आमदाराला अटक; जुहू पोलिसांनी घेतलं ताब्यात, काय आहे प्रकरण?

BJP Farmer Mla Subhash Pasi Arrested : फसवणुकीच्या एका जुन्या प्रकरणात सुभाष पाशी यास अटक करण्यात आली.

Satish Daud

संजय गडदे, साम टीव्ही

BJP Farmer Mla Subhash Pasi Arrested : उत्तर प्रदेशचे भाजपा नेते आणि माजी आमदार सुभाष पाशी यास अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या जुहू पोलिसांनी सुभाष पाशी यांना काल रात्री उशीरा अटक केली आहे. फसवणुकीच्या एका जुन्या प्रकरणात सुभाष पाशी यास अटक करण्यात आली.आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.  (Latest Marathi News)

यामुळे सुभाष पाशी याची आज सुटका देखील झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार जुहू परिसरातील एका निवृत्त जेष्ठ नागरिकाला घराची गरज होती. यासाठी त्याने सुभाष पाशी यांना घरासाठी वीस लाख रुपये रक्कम दिली. मात्र सुभाष पाशी यांनी त्या निवृत्त जेष्ठ नागरिकाला घर दिले नाही.(Breaking Marathi News)

यामुळे त्या ज्येष्ठ नागरिकांनी सुभाष पाशी विरोधात मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली होती. यानुसार जुहू पोलिसांनी कलम 420 भादवी नुसार गुन्हा नोंदवला होता. यानुसार काल रात्री सुभाष पाशी यास जुहू पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची जामीनावर सुटका देखील केली आहे.

सुभाष पासी उत्तर प्रदेश सैदपुर मतदार संघाचे भाजप (BJP) आमदार राहिले आहेत. पूर्वी ते मुंबईत समाजवादी पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढले होते. यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश करून उत्तर प्रदेश मध्ये सैदपूर मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली होती.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवार गटाला धक्का; २ बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते अजित पवार गटाच्या वाटेवर, लवकरच पक्षप्रवेश होणार

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढली

Shocking : मुंबईत रक्तरंजित थरार! हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू, हल्लेखोर बॉयफ्रेंडनेही आयुष्य संपवलं

EPFO Rule: तुमची कंपनी PF खात्यात कमी रक्कम जमा करतेय का? अशा प्रकारे एका क्लिकवर तपासा संपूर्ण माहिती

Urmila Matondkar: मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरचा दिवाळी स्पेशल ग्लॅमर्स लूक, पाहा खास PHOTO

SCROLL FOR NEXT