Gnesh Festival Kokan Saam TV
मुंबई/पुणे

भाजपकडून गणेशोत्सवानिमित्त कोकणवासीयांसाठी मोदी एक्स्प्रेसची सोय

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबई भाजपाच्या वतीने खास मोदी एक्स्प्रेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

जयश्री मोरे

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त कोकणात (Kokan) जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबई भाजपाच्या वतीने खास मोदी एक्स्प्रेसची व्यवस्था करण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते मोदी एक्सप्रेसला नारळ अर्पण करून हिरवा झेंडा दाखवण्यात आला त्यानंतर ही एक्सप्रेस सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली.

कोकणामध्ये मोठ्या उत्सवात गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा केला जातो. मुंबईमध्ये कामाला असलेले बहुतांश कोकणवासी गणेशोत्वासाठी आपल्या गावी जातात त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई भाजपाच्या वतीने खास मोदी एक्स्प्रेसची व्यवस्था करण्यात आली असल्याचं प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी सांगितलं.

मोदी एक्सप्रेसला (Modi Express) हिरवा झेंडा दाखवल्यावरती प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. काही वर्षांपासून भारतीय जनता पार्टी मुंबईतील कोकणवासीयांसाठी अशा प्रकारची मोदी एक्सप्रेस सोडत आहे.

मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोकणवासीय चाकरमानी राहतात आणि आता या महागाईच्या काळामध्ये त्यांना काही दिलासा मिळावा आणि सुखरूप आपल्या गावी जाता यावं याची काळजी भारतीय जनता पार्टीने घेतली आहे.

त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वतीने मोदी एक्सप्रेस कोकणवासीय चांकरमान्यांठी सोडण्यात येतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरिबांच्या कल्याणासाठी शेवटच्या माणसाचा विचार करायचा हा संस्कार भारतीय जनता पार्टीचा आहे.

कोकणातला सर्वात मोठा उत्सव गणेश उत्सव असतो आणि या मोदी एक्सप्रेसच्या माध्यमातून गणपती बाप्पा मोरया करत भाजपचा जयजयकार करत कोकणात त्या ठिकाणी मुंबईकर जाणार असल्याचं दरेकर म्हणाले.

गणेशोत्सवासाठी भाजपकडून ५०० बसेसची देखील सोय -

गणेशोत्सवासाठी मुंबई भाजपाकडून ५०० बसेस कोकणात रवाना करण्यात आल्या आहेत. अंधेरी येथून आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत काल ३० बसेस रवाना झाल्या. विशेष बाब म्हणजे या बसमधून तब्बल २० हजाराहून अधिक प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे. अशी घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Highway: महाराष्ट्राला मिळणार ३ नवे महामार्ग, कोणत्या जिल्ह्यातून जाणार? सरकारचा जबरदस्त मेगाप्लान

Saam Ganesh Chaturthi 2026 : 'साम टीव्ही'त गणेशोत्सवाचा जल्लोष; सहकाऱ्यांनी साकारली गणरायाची मनमोहक मूर्ती

Latest Mangalsutra Designs: मॉडर्न तरुणींसाठी मंगळसूत्राचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; इंडियन आणि वेस्टर्न दोन्हींवर शोभून दिसतील

Sahil Wakode Case: मुंबई IIT प्रकरणात मोठी घडामोड, साहिल वाकोडेच्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

लाऊडस्पीकरसाठी आता 1 लाखांचा डिपॉझिट! मुंबई हायकोर्टाचे कडक निर्देश|VIDEO

SCROLL FOR NEXT