Operation Lotus In Maharashtra Legislative Council Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: राज्यात पुन्हा एकदा भाजपचं ऑपरेशन लोटस?

Maharashtra Legislative Council News: सभापती पदासाठी राज्यात पुन्हा एकदा भाजपचे ऑपरेशन लोटस होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत, मुंबई

Maharashtra Vidhan Parishad News: राज्यातील विधान परिषदेच्या सभापती पदावर भाजपचा डोळा आहे. विधान सभेचे सभापतीपद आपल्याला मिळावे यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. सभापती पदासाठी राज्यात पुन्हा एकदा भाजपचे ऑपरेशन लोटस होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे सभापती पदासाठी निवडणूक लागल्यास राज्यात पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण रंगणार अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Maharashtra Politics Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषद सभापतीपदाचा फैसला होणार आहे. सभापती पदासाठी निवडणूक (Election 2022) लागल्यास राज्यात पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण रंगणार आहे.

सभापती पदासाठी भाजपकडून (BJP) राम शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. सध्या विधान परिषदेचे उपसभापतीपद हे उद्धव ठाकरे गटाच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे आहे. त्यामुळे सभापतीपद आपल्याकडे यावे यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी राष्ट्रवादीची मदत देखील भाजप घेऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Operation Lotus In Maharashtra Legislative Council)

काय सांगते आकडेवारी?

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ७८ पैकी २१ जागा रिक्त आहेत. सभागृहाचे संख्याबळ ५७ इतके आहे. भाजपकडे २२ सदस्य आहेत. निवडणूक झाली तर ती जिंकण्यासाठी भाजपला २९ मते लागतील, २२ + ७ = २९ म्हणजेच भाजपला आणखी सात मतांची गरज लागणार आहे.

राज्यपाल नियुक्त १२ आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या ९ अशा एकूण २१ जागा सध्या रिक्त आहेत. या जागा भरल्यास भाजपला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. (Latest Marathi News)

महाराष्ट्र विधान परिषदेत सध्याचे संख्याबळ

भाजप- २२

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ११

राष्ट्रवादी- ९

काँग्रेस ८

जदयू, शेकाप, रासप प्रत्येकी - १

अपक्ष - ४

विधान परिषद निवडणूक कशी होते?

विधानसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेत थेट निवडणूक प्रकिया होत नाही. विधान परिषदेत राष्ट्रपती निवडणूक, सिनेट यांसारख्या निवडणुकीसाठी पसंतीक्रमाची पद्धत इथे वापरली जाते. विधान परिषदे निवडणुकीसाठी जितके मतदार उभे असतील तेवढ्या उमेदवारांना पसंतीक्रम देता येतो. संबंधित मतदारसंघाची मतदारसंख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करते.

निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकांची मतं मिळवणारा उमेदवार विजयी होतो. पहिल्या पसंतीची मतं कोट्याएवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मतं जो पूर्ण करेल तो उमेदवार विजयी होतो. तर निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. यात कोणाचेही मतदान वाया जात नाही. (Maharashtra News)

विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजाराची शक्यता जास्त

विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजाराची शक्यता जास्त असते, कारण विधान परिषदेत आमदार हे गुप्त मतदान करतात. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता नेहमी व्यक्त केली जाते. राज्यसभेत खुलं मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागतं. पण विधानपरिषद निवडणुकीत तसं होत नाही, त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजाराची शक्यता जास्त असते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी सजला ‘श्री गणनायक’ रथ; केरळ मंदिराची प्रतिकृती पुण्यात उजळली पाहा मनमोहक VIDEO

Stress Relief Tricks : ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतोय? या ट्रिक करा फॉलो

Dnyanada Ramtirthkar: अवखळ हासरी, अल्लड लाजरी दिसते चंद्राची कोर साजरी ...

Pani puri masala recipe: घरीच बनवा पाणीपुरीच्या तिखट पाण्याचा सुका मसाला; एक चमचा पाण्यात घाला की काम झालंच

Anant Chaturdashi 2025 live updates : धाराशिवमध्ये जय मल्हार तरुण मंडळाने डीजेला बगल देत पारंपारिक पोतराज नृत्य सादर करत आपल्या बाप्पाची काढली मिरवणूक

SCROLL FOR NEXT