Political leaders react after Shinde Sena and MNS join hands in KDMC, reshaping the civic power equations. Saam Tv
मुंबई/पुणे

सत्तास्थापनेत नवा ट्विस्ट! भाजपला शह, शिंदेसेना–मनसे युतीमुळे सत्तेचा खेळ पलटला

Kdmc Politics ShindeSena Mns Alliance Bjp Shock: सत्तेसाठी सुरु असलेल्या पक्ष फोडाफोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय असं वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरेंचाच मनसे शिंदेसेनेच्या वळचणीला गेलाय.. खरं तर मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे करत भाजप आणि शिंदेसेनेला रोखण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले... मात्र महिनाभरातच युतीचा विचका झालाय... कल्याण डोंबिवली महापालिकेत विरोधात लढणाऱ्या मनसेने भाजपला शह देण्यासाठी थेट शिंदेसेनेसोबत घरोबा केलाय...

Bharat Mohalkar

दुसरीकडे केडीएमसीमधील मनसेनं शिंदेसेनेशी केलेली युतीमुळे राज ठाकरेही व्यथित असल्याचा दावा राऊतांनी केलाय.. सत्तास्थापनेसाठी मनसेनं ठाकरेसेनेची साथ सोडून शिंदेंना साथ दिल्यानं भाजपच्या हाती आयतं कोलित मिळालंय.. पत्त्यांचा बंगलाही जास्त काळ टिकतो... त्यापेक्षा कमी काळात ठाकरे बंधूंची युती तुटल्याचा टोला भाजपनं लगावलाय.. एवढंच नाही शिंदेसेनेनं भाजपला शह दिल्याची चर्चा रंगल्यानंतर आता भाजपनंही अप्रत्यक्षपणे शिंदेसेनेला इशारा दिलाय.... शिंदेसेनेनंही खेळी करण्याचा प्रयत्न केला तर फडणवीसांची खेळी महाराष्ट्राला माहिती आहे, असं वक्तव्य प्रवीण दरेकरांनी केलंय...

खरं तर कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिंदेसेनेनं स्वतंत्र निवडणूक लढवली होती... तर मनसे आणि ठाकरे सेनेनं एकीचा नारा दिला होता... मात्र निकालानंतर कल्याण डोंबिवलीकरांनी कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत दिलं नाही आणि सर्वच राजकीय पक्षांचं गणित बिघडलं. मात्र वर्चस्वाच्या या लढाईत शिंदेसेनेनं सत्तेचं समीकरण कसं जुळवलंय..पाहूयात...

कल्याण डोंबिवली महापालिकेत 122 जागा आहेत.. त्यामुळे बहुमतासाठी 62 जागांची आवश्यकता आहे. त्यात. शिंदेसेनेचे 53, ठाकरेसेनेचे 4 बंडखोर आणि मनसेच्या 5 नगरसेवकांसह शिंदेसेनेनं 62 जागांचा आकडा गाठलाय... तर भाजप 50, ठाकरेसेनेचे 7, काँग्रेसचे 2 आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक विरोधात बसण्याची शक्यता आहे...

आता या समीकरणानुसार कल्याण डोंबिवलीत भाजपला बायपास करुन शिंदेसेनेनं केडीएमसीभोवतीची आपली तटबंदी भक्कम केली आहेत.. त्यामुळे शिंदेंसाठी मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी दबावतंत्र वापरण्याचा मार्ग मोकळा झालाय.. त्यामुळे भाजपसाठी मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेचं गणित आणखीच कठीण झालंय.. हे मात्र निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ 1st T20: पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

धावत्या लोकल ट्रेनमध्ये चोरट्याने बदलापूरच्या तरुणाला धक्का दिला; चाकाखाली आल्याने पायाचे तुकडे, डोक्यालाही दुखापत

Daldal Trailer Out: नुसती कापाकापी! हिंसा पाहून अंगावर येईल काटा, थरकाप उडवणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित

Thursday Horoscope : तुमच्याविरुद्ध कोणीतरी कट रचण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना सावध निर्णय घ्यावा लागणार

भयंकर! अंगात कपडे नव्हते, हातात लाकडी दांडा; मनोरुग्णाच्या जीवघेण्या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT