Mahayuti Loksabha Election 2023  Saam TV
मुंबई/पुणे

Loksabha Election 2023 : भाजपने लोकसभेच्या 48 पैकी 30 जागा लढवाव्यात; निवडणुकीसंदर्भात संस्थांचं सर्वेक्षण

Maharashtra Political : युतीतील अनेक मतदारसंघ भाजपच्या मित्रपक्षांकडे आहेत. मात्र तेथे भाजपने निवडणूक लढवली तर फायद्याचं ठरु शकतं, असं सर्वेक्षणात दिसत आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांना कंबर कसली आहे. सर्वच पक्ष जास्तीत जास्त जागांवर आपले उमेदवार देण्यासाठी उत्सुक आहेत. महायुतीत जागा वाटपावरुन आतापासूनच रस्सीखेच सुरु आहे. कुणाला किती जागा मिळणार यावरुन महायुतीत मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे.

अशात निवडणुकीसंदर्भात सर्वेक्षण संस्थांच्या एका अहवालामुळे भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढण्याची शक्यता आहे. कारण भाजपने राज्यात ४८ पैकी ३० जागा लढवाव्यात असा निष्कर्ष या संस्थांच्या अहवालातून समोर आला आहे. भाजपने आपले विजयी मतदारसंघ याशिवाय नवीन जागा लढवण्याची शिफारस या सर्वेनंतर करण्यात आली आहे.

कोणत्या नवीन जागांचा समावेश

युतीतील अनेक मतदारसंघ भाजपच्या मित्रपक्षांकडे आहेत. मात्र तेथे भाजपने निवडणूक लढवली तर फायद्याचं ठरु शकतं, असं सर्वेक्षणात दिसत आहे. या मतदारसंघांमध्ये पालघरआणि ठाणे, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघांचा समावेश आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पालघर, ठाणे दोन्ही मतदारसंघ हे शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहेत. त्यात ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे शिवसेना मतदारसंघ सोडणार की यावरुन दोन्ही पक्षात मतभेद होतील हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

शहरी भागांमध्ये भाजपचा प्रभाव आहे. त्यामुळे या ठिकाणी कमळ चिन्ह प्रभावी ठरु शकते, असंही निरीक्षण सर्वेक्षणांतून नोंदवण्यात आलं आहे. शिंदे गटानेही काही उमेदवार बदलायला हवेत, असं भाजपने सुचवलं होतं. त्यामुळे या सर्व गोष्टींचा महायुतीवर किती परिणाम होतो, हे पाहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुती आणि मविआला हादरा; राज्यात नव्या आघाडीची नांदी, कुणाला फायदा अन् फटका?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी, बँकेबाहेर दिसल्या भल्यामोठ्या रांगा

Nandurbar : चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; नेसू नदीवर पूल नसल्याने पुरातून काढावा लागतो मार्ग

Maharashtra Live News Update : मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांची नोटीस

Political News : मराठी माणसांना भडकावून मते मिळवणे हाच ठाकरेंचा उद्देश; शिंदे गटाची आगपाखड

SCROLL FOR NEXT