Sharad Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

शरद पवार जातीयवाद करत नाहीत; केंद्रीय मंत्र्यांच वक्तव्य

मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जातीय समीकरणे सुरु झाली असल्याचा आरोप केला होता.

गोपाल मोटघरे

पुणे: भारतीय जनता पक्षासोबत (BJP) शिवसेनेने (shivsena) निवडणूक लढवली पण नंतर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी त्यांनी पाठीत खंजीर खुपसला शा खरपूस शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेवर टीका केली. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडवा मेळाव्यात शिवसेनेवर केलेल्या टिकेलाही आमचा पाठिंबा असल्याचे आठवले (Ramdas Athawale) यावेळी म्हणाले. ते पिंपरी चिंचवड मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी रामदास आठवले यांनी महापालिकेत भाजपबरोबर (BJP) युती करणार असल्याचे सांगितले. मुंबईतून शिवसेनेच्या हातातून सत्ता घेण्याच आमचे लक्ष्य आहे. यावेळी भाजप आणि आरपीआय (RPI) एकत्र येऊन मुंबईत शिवसेनेला मोठा धक्का देण्याचे उद्दिष्ट्य असल्याचेही आठवले म्हणाले.

त्यामुळे 2024 मध्ये 400 हून अधिक एनडीए जागा जिंकेल

लोकांच्या मनात नरेंद्र मोदी (Narendra Modi) आहेत. त्यांच्यामुळे चार राज्यात भाजपचा विजय झाला आहे. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे 2024 मध्ये 400 हून अधिक एनडीए जागा जिंकेल असा दावा आठवले यांनी केला. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला जातीयवादी पक्ष म्हंटले आहे, त्याचा अर्थ शरद पवार (Sharad Pawar) जातीयवाद करतात असा नाही, पण त्यांच्या खालचे नेते मात्र जातीयवाद करतात हे भीमा कोरेगाव इथे झालेल्या दंगलीच्यावेळी स्पष्ट झाले आहे, अस रामदास आठवले म्हणाले.

राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते पण त्यांना मत मिळत नाहीत

राज ठाकरे (Raj Thackeray) यांना बरोबर घेण्याची भाजपला आवश्यकता नाही, त्यांना आमचा विरोध आहे, राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते पण त्यांना मत मिळत नाहीत, त्यांना बरोबर घेतल्यास भाजपला तोटा होईल, त्यांची भूमिका देशपातळीवर भाजपला (BJP) सोयीची नाही, त्यामुळे त्यांना बरोबर घेण्याची गरज नाही, त्याला आमचा विरोध आहे असंही ते म्हणाले. हिंदूंनी मंदिरात भोंगा लावण्याला विरोध नाही, पण जाणीवपूर्वक मशिदीपुढे भोंगे लावून तणाव निर्माण करू नये, मशिदी वरून भोंगे काढण्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेला मात्र विरोध असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकार देश हिंदुत्ववाद करण्याचा प्रयत्न करता आहेत, या आरोपात तथ्य नाही, मोदी यांनी मुस्लिम, ख्रिश्चन समाजालाही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, त्यांचा अजेंडा विकासाचा आहे, तीन तलाकचा कायदा रद्द केल्यानंतर मुस्लिम महिलांनी मोदी यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ते फक्त हिंदूसाठी काम करतात असं नाही अस ही ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी एकत्र आलीतर मोठी ताकत उभा करता येईल, बाळासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व्हावे, त्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणुका लढू, वंचित चा प्रयोग महाराष्ट्रात चालणार नाही असेही (Ramdas Athawale) ते म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT