मुंबई/पुणे

डोंबिवलीत क्रिकेट मैदानासाठी भाजप-शिवसेना शिंदे गट आक्रमक; काय आहे संपूर्ण प्रकरण?

kalyan news : डोंबिवलीत क्रिकेट मैदानासाठी भाजप-शिवसेना शिंदे गट आक्रमक झाली आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Vishal Gangurde

डोंबिवलीत क्रिकेट मैदानाचा प्रश्न ऐरणीवर

क्रिकेट मैदानावरून वातावरण तापलं

रेल्वे प्रशासनाकडून खेळाडूंना क्रिकेट खेळण्यास मज्जाव

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवली पश्चिमेतील ठाकुर्ली येथील बावनचाळ परिसरात अनेक वर्षांपासून स्थानिक खेळाडूंच्या सरावासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रिकेट मैदानाच्या प्रश्नावर आता राजकीय वातावरण तापलंय. मैदानावर रेल्वे प्रशासनाने काम सुरू केल्याने खेळाडूंना क्रिकेट खेळण्यास मज्जाव करण्यात आला आहे. आता याविरोधात खेळाडू, नागरिक, भाजप आणि शिंदे शिवसेना आक्रमक झालेत.

मैदानावर अनेक वर्षांपासून परिसरातील खेळाडू क्रिकेटचा सराव करतात. रेल्वेकडून मैदानाच्या परिसरात काम सुरू करण्यात आलंय आहे. त्यामुळे खेळाडूंना या मैदानात क्रिकेट खेळता येत नाही. त्यामुळे संतप्त खेळाडूंनी मैदानावर आंदोलन करत आम्हाला मैदानात खेळू द्या, अशी मागणी केली. आंदोलनात सहभागी झालेल्या भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

'मैदान आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा इशारा राजकीय नेत्यांनी दिला आहे. तसेच स्थानिकांच्या भावनांचा विचार करण्याची मागणी करण्यात आलीये. या मैदानावर अजिंक्य रहाणे आणि निलेश कुलकर्णी सारख्या मोठे खेळाडूंनी देखील सुरुवातीच्या काळात सराव केला आहे.

'मैदान अनेक वर्षांपासून खेळाडूंसाठी उपलब्ध आहे. स्थानिक भूमिपुत्रांनी विकासासाठी जमिनी दिल्या आहेत. त्या बदल्यात नागरिकांना मिळालेल्या सुविधा हिरावून घेण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असं भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या मैदानाची पाहणी केली आहे. या प्रकरणात रेल्वे डीआरएम सी चर्चा देखील होणार आहे.

आमदार राजेश मोरेंनी मैदान वाचवण्यासाठी लढा सुरूच राहील, असे स्पष्ट केलंय. पुढील दोन दिवसांत रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांची भेट घेऊन या प्रश्नावर चर्चा करण्यात येणार आहे. खेळाडूंना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

शासकीय पडीक जमिनींबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना आदेश

पंतप्रधानपदासाठी खासदार फोडले, 2029च्या निवडणुकीसाठी अमित शाहांची तयारी

'ऑपरेशन टायगर' धोक्यात? एकनाथ शिंदेंची खेळी फसणार?

SCROLL FOR NEXT