Pravin Darekar Car Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

Pravin Darekar car accident news today : भाजपचे विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील गाडीला मुंबईच्या ईस्टर्न फ्री वेवर अपघात झाल्याची माहिती आहे. ताफ्यातील गाडीने टॅक्सी आणि दोन कारला धडक दिल्याचे सांगितले जात आहे.

Ganesh Kavade, Namdeo Kumbhar

Pravin Darekar Car Accident News : भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील गाडीला मुंबईतील ईस्टर्न फ्री वे (Eastern Freeway) वर अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सायनच्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या अपघातात दरेकरांच्या ताफ्यातील गाडीने टॅक्सीसह इतर दोन अशा एकूण ३ गाड्यांना धडक दिली. अपघातानंतर फ्री वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. या अपघातात आमदार प्रवीण दरेकर यांना कोणतीही दुखापत झालेली नसून ते पूर्णपणे सुरक्षित आहेत.

नेमकी घटना काय घडली?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आमदार प्रवीण दरेकर यांचा ताफा ईस्टर्न फ्री वे वरून सायनच्या दिशेने प्रवास करत होता. त्याचदरम्यान चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे किंवा अचानक समोर आलेल्या वाहनांमुळे हा अपघात घडल्याचा संशय आहे. ताफ्यातील गाडीने एका टॅक्सीला आणि २ कारला जोरदार धडक दिली. धडक एवढी तीव्र होती की त्यात वाहनांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल, वाहतूक सुरळीत

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फ्री वे वर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, मात्र पोलिसांनी तात्काळ गाड्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत आणि सुरळीत केली. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला, चालकाचा ताबा सुटला होता की इतर काही तांत्रिक बिघाड झाला होता, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरेकर सुरक्षित असल्याने कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT