Big Update on Lalit Patil Case Pune Police Shocking Information in Court Saam TV
मुंबई/पुणे

Lalit Patil Case: ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट; पुणे पोलिसांचा कोर्टात खळबळजनक दावा

Lalit Patil Case Updates: ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी कोर्टात खळबळजनक दावा केला आहे.

Satish Daud

Lalit Patil Case Latest Updates

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला नाशिकप्रमाणे पुण्यातही अंमली पदार्थ निर्मितीचा कारखाना सुरू करायचा होता. मात्र त्यांचे रॅकेट उघडकीस आल्याने त्यांचा डाव फसला, असा खळबळजनक दावा पुणे पोलिसांनी कोर्टात केला आहे. त्यामुळे ललित पाटील यांच्या डोक्यावर नेमका कुणाचा हात होता? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपी इम्रान शेख ऊर्फ अतिक अमीर खान याला कुर्ला येथून तर आरोपी हरिश्चंद्र पंत याला भोईसर येथून बुधवारी अटक केली आहे. या दोघांचा पुणे पोलिसांनी गुरुवारी ताबा घेतला.

या दोन्ही आरोपींनी ललित पाटील ला ड्रग्स तस्करी प्रकरणात मोठी मदत केल्याचा पुणे पोलिसांचा संशय आहे. दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी हा दावा केला आहे. न्यायलयाने दोन्ही आरोपींना २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हरिश्चंद्र पंत याचा नाशिक येथील एमआयडीसीमध्ये सुरू असलेल्या मेफेड्रोन निर्मिती कारखान्यामध्ये प्रशिक्षण, उत्पादन आणि विक्रीमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ललित पाटील आणि टोळीप्रमुख अरविंद लोहारे यांच्या सांगण्यावरून तो हे काम करीत होता.

दुसरीकडे या प्रकरणात अटकेत असलेल्या प्रज्ञा कांबळे हिचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. ललित पाटील प्रकरणी प्रज्ञा कांबळे हिला काही दिवसापूर्वी पुणे पोलिसांनी नाशिक येथून अटक केली होती. तिने पुणे सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, कोर्टाने तिचा अर्ज फेटाळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain Alert : राज्यातून गुलाबी थंडी गायब? ऐन हिवाळ्यात 'या' जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update: मनसे नेते अमित ठाकरे नेरुळमध्ये शिवस्मारकास अभिवादन करणार

Maharashtra Politics : मनसेसोबत आघाडीवरुन काँग्रेसमध्ये मतभेद; वडेट्टीवारांचं समर्थन, गायकवाडांचा विरोध, VIDEO

Maharashtra Politics : दादांची मतदारांवर दादागिरी? अजितदादांची 'अर्थ'पूर्ण दहशत? VIDEO

Maharashtra Politics: ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार? भाजपकडून शिंदेंची कोंडी?

SCROLL FOR NEXT