Vishal Tambe Latest News  Saam tv marathi news
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात शरद पवारांना जोरदार धक्का, विश्वासू शिलेदार राजकारणातून निवृत्त

Vishal Tambe Latest News : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला. माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याची घोषणा केली आहे.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Vishal Tambe quits politics Pune News : पुणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. पुण्यातील विश्वासू शिलेदार अशी ओळख असलेल्या विशाल तांबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी राजकारणातून सन्यास घेतल्याची माहिती दिली. महापालिका निवडणुकीत शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाला धक्का बसला आहे. विश्वासू शिलेदाराने सोशल मीडियावर पोस्ट लिहित राजकारणातून संन्यास घेतल्याचे सांगितलं.जरा विसावू या वळणावर असा मजकूर लिहित त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.ऐन महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच राजकारणातून संन्यास घेतला.

शरद पवार,सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय असलेले माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी धक्कादायक निर्णय घेतला. सलग तीन वेळा पुणे महापालिका नगरसेवक म्हणून विशाल तांबे निवडून आले होते. माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्षपद ही भूषवले आहे. २००७,२०१२ आणि २०१७ सलग तीन वेळेस धनकवडी परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. अचानक सोशल मीडियावर पोस्ट करत राजकारणातून निवृती जाहीर केली.

दक्षिण पुण्यात विशाल तांबेच वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे. गेले तीन वेळेस नगरसेवक राहिलेले विशाल तांबे यांनी केलेली कामे आणि आपण का थांबत आहोत याची माहिती पोस्टमध्ये लिहीत राजकारणातून संन्यास घेतला. राजकारण थांबवत असलो तरी समाजकारण आणि निस्वार्थ सेवा सुरू राहील अशी भावना व्यक्त करत राजकारणातून संन्यास घेतला आहे. दक्षिण पुण्यात होता विशाल तांबे याचा चांगला संपर्क आहे. ऐन निवडणुकीतून त्यांनी राजकारणाला रामराम ठोकल्याने पवारांच्या राष्ट्रवादीची कोंडी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

SCROLL FOR NEXT