Maharashtra Politics Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: नवी मुंबईत भाजपला मोठं खिंडार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

Shivsena Uddhav Thackeray Group: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नवी मुंबईमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला.

Priya More

Summary -

  • नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का.

  • भाजप, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश.

  • मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा.

  • महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाचे बळ वाढले.

नवी मुंबईमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप, काँग्रेसह इतर पक्षांचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांनी शिवबंधन हातामध्ये बांधलं. महापालिका निवडणुकीपूर्वी नवी मुंबईमध्ये हा भाजपसाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतल्या नेरुळ आणि बेलापूर येथील भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षामध्ये स्वागत करत त्यांच्या हातावर शिवबंधन बांधले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नवी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाची ताकद चांगलीच वाढली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या सर्वांना आगामी निवडणुकीमध्ये ताकदीने काम करण्याचे आवाहन केले.

यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, 'एक नवी सुरूवात संपूर्ण देशात होत आहे. कालचा दिवस देशाच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्वाचा होता. महाराष्ट्रात जे काही चालले आहे ते आपण सर्व पाहतोय आणि भोगत आहोत. भ्रष्टाचार ऐवढ्या उघडपणाने चालला आहे की महाराष्ट्रामध्ये बेबंदेशाहीच आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल मी काल आज आणि उद्या देखील तेच म्हणेल. जोपर्यंत या भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री असले तरी काय आणि नसले तरी काय कुणाला काहीच फरक पडत नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तेल्हारा नगरपालिकेत वंचित आणि शेतकरी पॅनलसह तेल्हारा विकासमंच'मध्ये युतीची घोषणा

कोकणात महायुतीत वादाची ठिणगी, शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक; माजी आमदारासह ३९ पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा

Kalyan News: धक्कादायक! १९ व्या मजल्यावरून उडी घेत १४ वर्षीय मुलीची आत्महत्या, हृदय हेलावणारी घटना सीसीटीव्हीत कैद

Palghar Tourism : वीकेंडला करा जोडीदारासोबत ट्रेकिंगचा प्लान, पालघरमध्ये आहे सुंदर डेस्टिनेशन

महायुतीत पुन्हा एकदा बिघाडी! भाजप-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत क्षुल्लक कारणावरुन वाद

SCROLL FOR NEXT