Shivsena Bhavan News Saam Tv
मुंबई/पुणे

Shivsena Bhavan News : उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा; एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

विधीमंडळातील शिवसेना कार्यालयावर ताबा घेतल्यानंतर आता शिंदे गट शिवसेना भवनावर ताबा घेणार असल्याच्या उलट सुटल चर्चा सुरू होत्या

साम टिव्ही ब्युरो

Shivsena Bhavan News : केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर आता शिंदे गट अधिकच आक्रमक झाला आहे. त्यांनी शिवसेनेच्या शाखा आणि पक्षकार्यालांवर ताबा घेण्यास सुरूवात केली आहे. विधीमंडळातील शिवसेना कार्यालयावर ताबा घेतल्यानंतर आता शिंदे गट शिवसेना भवनावर ताबा घेणार असल्याच्या उलट सुटल चर्चा सुरू होत्या. (Latest Marathi News)

मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण, शिवसेना भवनावर आम्ही ताबा घेणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आम्ही कोणाच्याही कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नाही आम्हाला त्याची गरज नाही, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे नेत आहोत. त्याच्या कोणत्याही मालमत्तेवर आमचा दावा नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. आम्हाला बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे त्यामुळे आम्हाला काहीही नको, तुम्हाला कोणीही काहीही सांगितल तरी विश्वास ठेवू नका. मी अधिकृत पणे सांगतो कोणत्याही संपत्तीवर आमचा दावा नाही. अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, शिंदे गट दादरच्या शिवसेना भवनावर ताबा घेणार असल्याच्या उलट सुलट चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. मात्र, असं असलं तरी शिंदे गटाकडून शिवसेनेच्या शाखांवर ठिकठिकाणी कब्जा केला जात आहे.

 महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची आज 'सुप्रीम' सुनावणी

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत आजपासून तीन दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेविषयीची ही सुनावणी होणार असून निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर आता सुप्रीम कोर्ट 16 आमदारांच्या निलंबनाबाबत काय निर्णय देणार, याकडेच सर्वांचंच लक्ष लागून आहे. (Political News)

याआधी मागच्या आठवड्यातही लागोपाठ तीन दिवस या मुद्द्यावर सुनावणी झाली होती, पण सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला. यानंतर आता पुन्हा एकदा मंगळवारपासून पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू होईल. सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीष साळवे आणि महेश जेठमलानी युक्तीवाद करतील.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Food : वाटीभर काजू अन्...; कोकणात सणासुदीला आवर्जून बनवला जातो 'हा' गोड पदार्थ, रेसिपी फक्त ५ मिनिटांत तयार

भारत-पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध भडकणार; अमेरिकेचा हादरवणारा दावा, ३४ पानी रिपोर्टमध्ये पाकिस्तानचा प्लान सांगितला

गुढीपाडव्याच्या दिवशीच शेअर बाजार कोसळला; ११.५ लाख कोटींचा चुराडा, २१ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण

Maharashtra Live News Update: जालन्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

Health Care: सलग ३० दिवस बडीशेपचे पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT