Navi Mumbai CIDCO Homes Saam Tv
मुंबई/पुणे

CIDCO Homes: आनंदाची बातमी! सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार? सरकार आज घेणार मोठा निर्णय

Navi Mumbai CIDCO Homes: सिडकोच्या घरांबाबत आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. सिडकोची घरं स्वस्त होणार असल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बैठक बोलावली आहे.

Priya More

Summary -

  • सिडकोच्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे

  • आज घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात महत्वाची बैठक होणार आहे

  • बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे

  • घरांच्या भरमसाठ किमतीमुळे १८,००० लोकांनी घरे रद्द केली

विकास मिरगणे, नवी मुंबई

नवी मुंबईत आपल्या हक्काचे घर असावे असे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आणि स्वस्त घर खरेदी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सिडकोच्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात आज महत्वाची बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सिडकोच्या घरांच्या किमती करण्यासंदर्भात मागणी केली जात आहे. विरोधकांनी आणि भाजपचे आमदार विक्रांत पाटील यांनी सुद्धा सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात सरकारला घेरले होते. तसेच पावसाळी अधिवेशनामध्ये घरांच्या किमती कमी केल्या जातील असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले.

मात्र चार वेळा सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भामध्ये बैठक रद्द करण्यात आली होती. मात्र आता या बैठकीला मुहूर्त मिळाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज ही महत्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला सिडकोचे अधिकारी आणि नगर विकास विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील.

सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भामध्ये या बैठकीत चर्चा होणार आहेत. मंत्रालयामध्ये आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि भाजप आमदार विक्रांत पाटील यांना आमंत्रित करण्यात आला आहे. सिडकोने २६ हजार घरांची लॉटरी काढण्यात आली होती.

मात्र घरांच्या किमती भरमसाठ असल्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर जात असल्यामुळे जवळपास १८ हजारांपेक्षा अधिक लोकांनी घर रद्द करण्यात आली आहेत. तसेच अनेकांचे घर घेतल्यानंतर हप्ते सुद्धा सुरू झाले आहेत. या घरांच्या किमती कमी करण्यात याव्यात अशी मागणी केली जात आहे. आज याबाबत मोठा निर्णय होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पर्यटक तरूणीला आधी शरीरसंबंधाची मागणी, भररस्त्यावर हस्तमैथून; पीडितेनं VIDEO शूट करून व्हायरल केला, नेमकं घडलं काय?

Health Care : गुडघ्यांचं दुखणं थांबवण्याचा रामबाण उपाय, वापरा 'हे' घरगुती तेल

Palghar: बाळंतीण महिलेला रुग्णवाहिकेनं अर्ध्या रस्त्यात सोडलं, बाळाला घेऊन २ किमीपर्यंत पायपीट; पालघरमधील संतापजनक घटना

Maharashtra Live News Update : निवडणूक आरक्षणावर पुढील सुनावणी शुक्रवारी

Supreme Court : निवडणूक आरक्षणावर कोर्टात काय झालं? सर्वोच्च न्यायालयाने सरकार अन् आयोगाला झापलं

SCROLL FOR NEXT