Eknath Shinde News : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे यांच्या 'मशाल' या निवडणूक चिन्हानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या ढाल-तलवार निवडणूक चिन्हावरही आक्षेप घेण्यात आला आहे. ढाल-तलवार या निवडणूक चिन्हावर शीख समाजाने आक्षेप घेतला आहे. (Shivsena Eknath Shinde News Today)
ढाल-तलवार ही शिखांची धार्मिक निशाणी आहे. त्यामुळे हे निवडणूक चिन्ह देऊ नये अशी मागणी गुरूद्वारा बोर्डाकडून करण्यात आली आहे. सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य सरजार रणजीत सिंह यांनी केली आहे. निवडणूक आयोगाला तसा ई-मेल करून त्यांनी हा आक्षेप घेतला आहे. (Latest Marathi News)
केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव मिळालेलं आहे. दुसरीकडे आयोगाने ठाकरेंना मशाल चिन्ह दिलेलं आहे. तर शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाला ढाल तलवार चिन्ह प्रदान केलं. (Maharashtra News)
दरम्यान, निवडणूक आयोगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिलेल्या ‘धगधगती मशाला’ या चिन्हावर समता पक्षाने दावा केला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला मशाल चिन्ह देऊ नये, अशी मागणी समता पक्षाने केली आहे. त्याबाबत समता पक्षाकडून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.
एकीकडे ठाकरे गटाच्या ‘धगधगती मशाला’ मशाल या निवडणूक चिन्हावर समता पक्षाने दावा केला असतानाच, दुसरीकडे आता शिंदे गटाच्या ढाल-तलवार या निवडणूक चिन्हावरही शीख समाजाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग या आक्षेपावर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.