Eknath shinde and Devendra Fadnavis  saam tv
मुंबई/पुणे

Shinde Fadnavis Government : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला!

सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास महिनाभराचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाहीये. त्यामुळे विरोधकांनी सरकारला अक्षरश: धारेवर धरलं आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या ७ दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. (Shinde Fadnavis Government Latest News)

सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. त्याचवेळी पुढील आठवड्यात पावसाळी अधिवेशन घेणार असल्याच्या हालचाली सुद्धा सुरू असल्याची माहिती आहे. दुसरीकडे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तान नेमका कधी होणार याचीच राज्यातील जनतेला लागली आहे. (Shinde Fadnavis Government Cabinet formula Decided)

आता सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या ७ दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होईल. असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराला दिल्लीतून सुद्धा हिरवा कंदील मिळाला असल्याचं कळतंय. ६०:४० च्या फॉर्म्युल्यानुसार खाते वाटप निश्चित असल्याचे बोलले जात आहे. (Eknath Shinde Latest News)

दरम्यान, पुढील आठवड्यात राज्यात पावसाळी अधिवेशन घ्यायच्या हालचाली सुद्धा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या ९ ऑगस्टपासून मुंबईत विधासभेचं पावसाळी अधिवेशन घेण्याबाबत संकेत मिळत आहेत.

त्यामुळे मुंबईत हे अधिवेशन घेण्याबाबत विचारविनिमय सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्या आधीच राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असंही सूत्रांनी सांगितलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : ऐन निवडणुकीत सापडलं ५ कोटींचं घबाड; कोट्यवधींची रोकड पाहून अधिकाऱ्यांना बसला धक्का

Nitin Gadkari News : आमदार निवडताना त्याची जात का पाहता?, गडकारींचा परखड सवाल

Tamarind Benefits: हृदय निरोगी ठेवण्यासाठी बिनधास्तपणे खा चिंचा...

Maharashtra News Live Updates: प्रियंका गांधी कोल्हापुरात दाखल

तुम्हाला संध्यकाळी भूक लागते का? तर या प्रकारचा पिस्ता खाल्याने फायदा होऊ शकतो

SCROLL FOR NEXT