
मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचे बोलले जात आहे. एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा गट तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता दोन्हीकडून आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा करण्यात येत आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळणार असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्यांनी केला आहे.
शिवसेनेचे याचिकांवर ८ ऑगस्ट रोजी सुनवाणी होणार आहे. या सुनावणीत आमदारांवर कारवाई होणार का याचा निर्णय होणार आहे. याअगोदर आता शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कोमाला मिळणार याच्या चर्चा सुरू आहेत. शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना दुसरे चिन्ह सुचवले आहे.(ShivSena Latest News)
'धनुष्यबाण हा शिंदे गटाला मिळणार आहे, आम्ही आमच्या फॉर्मवर धनुष्यबाण लिहून ठेवले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे बघितले पाहिजे, उद्धव ठाकरे यांंनी जास्त वाईट वाटून न घेता ढाल तलवार हे चिन्ह घ्यावे, दोन्ही शस्त्रेच घ्यावीत. ढाल तलवार चिन्ह घेऊन या निवडणुकीला, कशाला भांडत बसता', असंही आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले.
भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात विभागीय बैठक होणार आहे. या बैठकीला चंद्रकांत पाटील गैरहजर आहेत. त्यामुळे आता पुन्हा चंद्रकांत पाटील नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी पनवेल येथील भाजपच्या मेळाव्यात पाटील यांनी मुख्यमंत्री पदावरुन नाराजी व्यक्त केली होती. (Eknath Shinde Latest News)
भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पनवेल येथील मेळाव्यात आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले आहे, असं वक्तव्य केले होते. आज या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे विभागाची बैठक बोलवली आहे. या बैठकीला चंद्रकांत पाटील गैरहजर आहेत. या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदारही हजर आहेत. त्यामुळे आता नाराजीच्या चर्चांना उधाण आले आहे.(Eknath Shinde Latest News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.