Chandrakant Patil On Sage Soyare Ordinance Saam Tv
मुंबई/पुणे

Sage Soyare Ordinance: मोठी बातमी! राज्य सरकार लवकरच सगेसोयऱ्याचा अध्यादेश काढणार, चंद्रकात पाटील यांची माहिती

Chandrakant Patil On Sage Soyare Ordinance: मनोज जरांगे पाटील यांची मागणी पूर्ण होणार आहे. राज्य सरकार लवकरच सगेसोयऱ्याचा अध्यादेश काढणार, अशी माहिती मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली

Satish Kengar

एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मराठा नेते मनोज जरांगे पाटील जी मागणी करत होते, ती लवकरच पूर्ण होणार आहे. राज्य सरकार लवकरच लवकरच सगेसोयऱ्याचा अध्यादेश काढणार, अशी माहिती राज्यातील मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

काय म्हणाले चंद्रकात पाटील?

माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकात पाटील म्हणाले की, ''मनोज जरांगे पाटील यांना सरकार वारंवार आवाहन करत आहे की, सगेसोयऱ्याची जी अधिसूचना काढली आहे, ज्याचा मसुदा त्यांनी तयार केला आहे, त्यावर ८ लाखांहून अधिक सूचना व हरकती आल्या आहेत. त्या टॅकल केल्यानंतर ती अधिसूचना आम्ही काढणार आहोत.''

ते म्हणाले की, ''याने ओबीसी समाजाने घाबरण्याचं काही कारण नाही. ओबीसी समाजालाही सरकार समजावत आहे. सगेसोयऱ्याचा अध्यादेश निघाल्यानंतर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का बसणार नाही.''

पाटील म्हणाले की, ''या अधिसूचनेत काय आहे, तर एकाला नोंद सापडली, तर त्याच्या नातेवाईकाला ती मिळावी. २०१७ सालीच त्यावेळी मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी रक्त संबंधांमध्ये व्हेरीफिकेशनची आवश्यकता नाही, असा कायदा केला आहे.''

दरम्यान, मनोज जरांगे पाटील पुन्हा मराठा आरक्षणासाठी राज्याच्या दौऱ्यावर निघाले असून या मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीला हिंगोलीतून सुरुवात झाली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी आरोप केला आहे की, जातींमध्ये तेढ वाढवून छगन भुजबळ यांचा दंगल घडवण्याचा डाव आहे. आता जरांगे यांच्या आरोपावर छगन भुजबळ काय उत्तर देतील, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT