Bhagat Singh Koshyari News Saam Tv
मुंबई/पुणे

सर्वात मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी

माझी चूक झाली माफ करावे असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी अखेर महाराष्ट्राची माफी मागितली आहे. कोश्यारी यांनी मुंबईबाबतच्या आपल्या वादग्रस्त विधानाबद्दल माफी मागितली आहे. 29 जुलै रोजीच्या एका कार्यक्रमात मुंबईच्या (Mumbai) विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडुन कदाचित काही चूक झाली, असे म्हणतं कोश्यारी यांनी आपली चूक मान्य केली आहे. एक प्रसिद्धीपत्रक जारी करत त्यांनी ही माफी मागितली आहे. माझी चूक झाली माफ करावे असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (Governor Bhagat Singh Koshyari Latest News)

राज्यपाल कोश्यारी यांचा माफीनामा जसाच्या तसा

प्रसिद्धीसाठी निवेदन

दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडुन कदाचित काही चूक झाली.

महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.

गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.

परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही.

महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.

भगत सिंह कोश्यारी राज्यपाल, महाराष्ट्र

राज्यपाल कोश्यारी नेमकं काय म्हणाले होते?

मुंबई आणि आसपासच्या शहरातून गुजराती आणि राजस्थानी माणून बाहेर काढला तर मुंबईत पैसाच उरला नाही. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून पाहिलं जातं. मात्र हे लोक गेल्यानंतर मुंबई देशाची आर्थिक राजधानीही उरणार नाही. असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

राज्यातील अनेक नेत्यांनी कोश्यारी यांच्यावर टीकेचा भडीमार केला होता. इतकंच नाही तर भाजपने सुद्धा राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही असं जाहीर केलं होतं. त्यामुळे राज्यपाल कोश्यारींची मोठी कोंडी झाली होती. राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा आंदोलन करू असा इशाराही महाराष्ट्राती काही संघटनांनी दिला होता. दरम्यान, या सर्व वादानंतर आज राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राची माफी मागितली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर यंदा कडक निर्बंध

Bhiwandi Crime : भिवंडीत संतापजनक प्रकार, ७ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, भावाला पाणी आणायला पाठवलं अन...

Diarrhea : फूड इन्फेक्शन अन् ॲसिडीटी नाही; वारंवार जुलाब हे 'या' गंभीर आजाराचे लक्षण असू शकते

केंद्र सरकारचा एलपीजी गॅस सिलिंडरवर मोठा निर्णय, हॉटेल व्यावसायिकांना होणार फायदा, वाचा काय घेतला निर्णय?

Maharashtra Rain : राज्यात पुढील ३ दिवस महत्त्वाचे; २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट,वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT