Devendra Fadnvis, Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

सर्वात मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव; राज्यात आता 'शिंदेशाही'

शिंदे यांच्या प्रस्तावाच्या बाजूनं 164 मतं पडली.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई :आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारनं राजकीय पटलावरची आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठरावाची लढाई जिंकली आहे. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु झाल्यानंतर आवाजी मतदानानं बहुमत चाचणी पार पडली. यात शिंदे यांच्या प्रस्तावाच्या बाजूनं 164 मतं पडली. या मतांसह एकनाथ शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. (Eknath Shinde Government Latest News)

164 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. गेले 10 दिवस चाललेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

दरम्यान, आज शिंदे-फडणवीस सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागलं. दरम्यान, काल झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. नार्वेकर यांना 164 मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधातील राजन साळवी यांना 107 मतं मिळाली होती.

बहुमत चाचणीपूर्वी भाजप-शिंदे गटाच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड केली आहे. रविवारी विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड झाली आहे. त्यांनीही शिंदे यांना विधीमंडळ गटनेते म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे अजय चौधरी यांचे गटनेतेपद रद्द झालं. शिंदे यांच्या गटनेतेपदाला मान्यता दिली असल्यामुळे भरत गोगावले हेच मुख्य प्रतोद असल्याचं मान्य करण्यात आलं आणि शिवसेनेचे सुनील प्रभू यांना दिलेलं मुख्य प्रतोदपद रद्द करण्यात आलं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

Thane : ५६९ जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मनसैनिकाची शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ठाण्याचा शिवसैनिक खवळला

SCROLL FOR NEXT