Maharashtra Political News Saam TV
मुंबई/पुणे

Breaking News: महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाचे संकेत; शरद पवार गटातील बडा नेता भाजपमध्ये करणार प्रवेश?

Maharashtra Politics: अशोक चव्हाण यांना पक्षात आणल्यानंतर आता राष्ट्रवादीतील (शरद पवार) एका बड्या नेत्याला पक्षात आणण्याच्या भाजपच्या जोरदार हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

Satish Daud

Maharashtra Political Latest News

ऐन लोकसभा २०२४ निवडणूक तोंडावर असताना भाजपने रणनिती आखत काँग्रेसला मोठा धक्का दिला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पक्षात घेऊन भाजपने मराठवाड्यात आपली ताकद वाढवली. दरम्यान, काँग्रेसनंतर भाजप आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशोक चव्हाण यांना पक्षात आणल्यानंतर आता राष्ट्रवादीतील (शरद पवार) एका बड्या नेत्याला पक्षात आणण्याच्या भाजपच्या जोरदार हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. हा नेता पश्चिम महाराष्ट्रातील असल्याचं सांगितलं जातंय.

पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी तसेच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, भाजपकडून या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असलेल्या या भागातील एका दिग्गज नेत्याला सोबत घेण्याच्या भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत.

महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी ४२ हून अधिक जागा जिंकायच्या असतील, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांतील महत्त्वाचे नेते आपल्यासोबत आणले पाहिजेत तरच ते शक्य होईल, अशी भाजपची भूमिका आहे. यासाठीच भाजप प्रयत्नशील आहे.(Latest Marathi News)

दरम्यान, राष्ट्रवादीतील बंडात शरद पवार यांना आजवर साथ दिलेला हा नेता अजित पवार यांच्यासोबत जाणार अशा चर्चा काही दिवसांपासून रंगल्या होत्या. इतकंच नाही, तर मंत्रिमंडळात या नेत्याला महत्त्वाचे खाते देखील मिळणार, अशा बातम्या मध्यंतरी होत्या, पण त्या नेत्याने त्याबाबत इन्कार केला. आता बडा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

आता शरद पवार गटाचा हा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या नेत्याला दीर्घकाळ राज्यातील महत्त्वाची खाती सांभाळण्याचा अनुभव आहे. तसेच त्यांचं सहकार क्षेत्रातही मोठं नाव आहे. त्यामुळे भाजपसोबत जाणारा तो नेता कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी, शिवाजी पार्कवर उद्धव यांच्यासह राजही दिसणार?

Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सर न होण्यासाठी कोणते पदार्थ टाळावे?

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांचा एकत्र विमानाने प्रवास

Taloda Heavy Rain : मुसळधार पावसामुळे आतोनात नुकसान; मिरचीसाठी अडीच लाख खर्च, उत्पन्न २५ हजाराचे

Pitru Paksha 2025: पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पितृपक्षात करा हे दान

SCROLL FOR NEXT