MHADA House  Saam tv
मुंबई/पुणे

MHADA House: मोठी बातमी! २३० स्क्वेअर फुटाची घरे असणाऱ्यांना १६०० स्क्वेअर फुटांचे घर मिळणार; म्हाडाचा सर्वात मोठा प्रकल्प कुठे? कोणकोणत्या सुविधा?

Mumbai MHADA House: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाने आपला पहिला टाऊनशिप प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत २३० स्क्वेअर फुटाची घरे असणाऱ्यांना १६०० स्क्वेअर फुटांचे घर मिळणार आहेत.

Priya More

Summary -

  • म्हाडाकडून मुंबईतील सर्वात मोठा टाऊनशिप प्रकल्प

  • मोतीलालनगर येथे १४३ एकरवर विकास

  • २३० स्क्वेअर फुटाची घरे असणाऱ्यांना १६०० स्क्वेअर फुटांचे घर मिळणार

  • आधुनिक सुविधा आणि खासगी बिल्डर्सना टक्कर देणारा म्हाडाचा जबरदस्त प्रकल्प

संजय गडदे, मुंबई

मुंबईत मोठ्या प्रमाणात पुनर्विकास प्रकल्प सुरू असताना आता म्हाडाने आपला पहिला टाऊनशिप प्रकल्प हाती घेतला आहे. गोरेगाव येथील मोतीलाल नगरमध्ये हा भव्य प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी म्हाडाने मास्टर प्लॅनही तयार केला आहे. तब्बल १४३ एकर जागेवर आधुनिक टाऊनशिप उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. २३० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्यांना थेट १,६०० चौरस फुटांची घरे मिळणार आहेत.

या पुनर्विकासाअंतर्गत सध्या २३० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना तब्बल १,६०० चौरस फुटांची मोठी आणि आधुनिक घरे मिळणार आहेत. सुमारे १४३ एकर जागेवर ही टाऊनशिप विकसित केली जाणार आहे. म्हाडा आतापर्यंत लहान प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत होता. मात्र आता मोठे आणि आधुनिक प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना केवळ परवडणारी घरेच नव्हे, तर प्रायव्हेट बिल्डरप्रमाणे सुसज्ज आणि दर्जेदार घरे मिळणार आहेत.

या टाऊनशिपमध्ये क्रीडांगणे, सांस्कृतिक केंद्रे, तसेच व्यावसायिक सुविधा देखील उपलब्ध असतील. हा प्रकल्प C & DA मॉडेल अंतर्गत राबवला जाणार असून बांधकामाचे काम इतर एजन्सीकडे दिले जाईल. मात्र, प्रकल्पाचे पूर्ण नियंत्रण आणि जबाबदारी म्हाडाकडेच राहणार आहे. मोठ्या एकात्मिक लेआउटमध्ये पुनर्विकासावर भर दिली जाणार आहे.

प्रायव्हेट बिल्डर्सना टक्कर देणारी आलिशान घरे देण्याच्या दिशेने म्हाडाचे पाऊल आहे. मुंबईSummary Points (Marathi)

  • MHADA कडून मुंबईतील सर्वात मोठा टाऊनशिप प्रकल्प

  • Motilal Nagar येथे १४३ एकरवर विकास

  • २३० स्क्वेअर फुट घर → १६०० स्क्वेअर फुट मोठे घर

  • आधुनिक सुविधा आणि खासगी बिल्डर्सना टक्कर देणारा प्रकल्पच्या रिअल इस्टेटमध्ये मोठा गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. मोतीलाल नगरसोबतच एसव्हीपी नगर, जीटीबी नगर, अभ्युदय नगर, कामाठीपुरा, आदर्श नगर आणि आराम नगर या भागांमध्येही अशाच प्रकारचे विकास प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पामुळे मुंबईच्या गृहनिर्माण क्षेत्रात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT