एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरुन पक्षबांधणीला सुरूवात केली आहे. नाशिक, सोलापूर दौऱ्यानंतर आता उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार आहे. मात्र, या दौऱ्याआधीच ठाकरे गटाला मोठा खिंडार पडण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते मनसेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सिल्वासा येथील ठाकरे गटाचे तब्बल ५०० कार्यकर्ते राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेत प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. रविवारी सकाळी १० वाजता मुंबईत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) रविवारी (४ फेब्रुवारी) सिंदुदुर्गे जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. कुडाळमध्ये ते कॉर्नर सभा घेणार असून या सभेसाठी शिवसैनिकांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे या सभेला माजी खासदार निलेश राणे यांनी विरोध केला आहे. उद्धव ठाकरे यांनी सभा एखाद्या मैदानात किंवा हॉलमध्ये घ्यावी, असा सल्ला निलेश राणे यांनी दिला आहे. (Latest Marathi News)
उद्धव ठाकरे कुडाळ शहरामध्ये सभा घेत असल्यामुळे शहरात प्रचंड ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊ शकते, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर आमच्यावर उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभेमुळे कोणताच परिणाम होणार नसल्याचंही राणे म्हणाले.
रविवारी सकाळी ११ वाजता उद्धव ठाकरे यांचे मोपा विमानतळ येथून सावंतवाडी येथे आगमन होईल. ११ वाजून ४५ मिनिटांनी ते गांधी चौक-सावंतवाडी आणि दुपारी १२ वाजता कुडाळ-जिजामाता चौक येथे कॉर्नर सभा घेऊन शिवसैनिकांना संबोधित करतील.
दुपारी ३ वाजेच्या सुमारास उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज मंदिरातील सिंहासन आणि मंदिर नूतनीकरणाचे लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता आंगणेवाडी येथील भराडी देवीचे दर्शन घेणार आहे. सायंकाळी ६ वाजता कणकवली येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.