Sharad Pawar setback Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

पुण्यात शरद पवारांसह अजित पवारांना धक्का; भाजपने पाडले खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीला रामराम

Sharad Pawar setback : पुण्यातील भोर आणि मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच इतर पक्षातील शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार संग्राम थोपटे, आ. प्रसाद लाड, आ. विक्रांत पाटील आदी उपस्थित होते.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

  • भोर आणि मुळशीतील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीला रामराम करून भाजपमध्ये दाखल.

  • माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

  • भाजप नेत्यांनी विकासाच्या गतीला चालना देण्याचे आश्वासन दिले.

  • या घडामोडीमुळे पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला.

Sharad Pawar NCP leaders joining BJP in Pune : पुणे जिल्ह्यातील भोर आणि मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गट, अजित पवार गट तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रवेश केलेल्यांमध्ये मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग ओझरकर, सुखदेव तापकीर, सुरेश हुलावळे, अमित कंधारे, पांडुरंग राक्षे, मोरेश्वर घारे यांचा समावेश आहे. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार संग्राम थोपटे, आ. प्रसाद लाड, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, कार्यालय सहसचिव भरत राऊत आदी उपस्थित होते. भोर मुळशीचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली हे प्रवेश झाले.

यावेळी चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्यात विकासाचे पर्व सुरू आहे. ‘सबका साथ सबका विकास’ या मंत्राप्रमाणे सर्वदूर विकासात्मक कामे गतीने सुरू आहेत. आज या सर्व कार्यकर्त्यांनी ज्या विश्वासाने भाजपा मध्ये प्रवेश केलाय त्या विश्वासास पात्र ठरण्याचा प्रयत्न आम्ही करू. या परिसरात अनेक वर्षे असलेला विकासात्मक अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्नही आपण एकत्रितपणे करू अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.

संग्राम थोपटे म्हणाले की राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी आम्ही सर्व महायुती सरकारसोबत येऊन काम करू. मुळशी तालुक्यातील आजी माजी सरपंच, विकास सोसायटीचे आजी माजी चेअरमन, ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. प्रवेश केलेल्यांमध्ये माणचे उपसरपंच शशिकांत धुमाळ, उपसरपंच रवि बोडके, हिंजवडीचे मा. सरपंच विक्रम साखरे, माणचे मा. उपसरपंच बाळासाहेब बालवडकर, शप गट जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस निलेश भोईर, मारुंजीचे मा.सरपंच बाळासाहेब बुचडे, कातरखडकचे मा.सरपंच योगेश पापळ, माण सोसायटी चेअरमन विलास गवारे, अर्जुन पारखी आदींचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच गोविंदचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

Government Employee Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! आता २० वर्षाच्या सेवेवर मिळणार पेन्शन

SCROLL FOR NEXT