Narayan Rane Saam Tv
मुंबई/पुणे

Narayan Rane : नारायण राणेंना मोठा धक्का! हायकोर्टाने ठोठावला १० लाखांचा दंड; काय आहे प्रकरण?

मंत्री नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Narayan Rane News : भाजप नेते तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. जुहूमधील ‘अधीश’ या ७ मजली बंगल्यातील बेकायदा बांधकाम नियमित होऊ शकत नाही, असं म्हणत हायकोर्टाने राणे (Narayan Rane) यांच्या कंपनीची याचिका फेटाळली आहे. याव्यतिरिक्त कोर्टाने राणे यांना १० लाखांचा दंडही ठोठावला आहे.

राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) दिले आहेत. पुढील दोन आठवड्यांत अतिरिक्त बेकायदा बांधकाम तोडण्याची कारवाई करून नंतरच्या एक आठवड्यात कृती अहवाल सादर करा, असंही हायकोर्टाकडून पालिकेला सांगण्यात आलं आहे. (Narayan Rane News Today)

नारायण राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले असल्याची तक्रार मुंबई महापालिकेला प्राप्त झाली होती. त्यानंतर महापालिकेने नारायण राणे यांच्या बंगल्याची तपासणी करण्याची नोटीस बजावली होती. मुंबई महानगरपालिका कायदा 1888 अंतर्गत सेक्शन 488 नुसार राणेंना ही नोटीस पाठवण्यात आली होती.

त्यानंतर महापालिकेने बांधकाम तोडण्याची नोटीस बजावली होती. त्यावरून राणे यांनी कोर्टात धाव घेतली होती. राणे यांच्यावरील कारवाई ही महाविकास आघाडी सरकारने सूडबुद्धीने केल्याचा आरोप राणे आणि भाजपने केला होता. मात्र, राणे यांनी केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली होती.

दरम्यान, पहिली याचिका फेटाळल्यानंतर नारायण राणे यांनी दुसऱ्यांदा याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. इतकंच नाही तर, राणेंवर एफएसआय आणि सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

या बंगल्यात बेकायदा बांधकामासाठी करण्यात आलेला अर्ज महापालिका विचारात घेऊ शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. येत्या दोन आठवड्यात बंगल्यातील बांधकाम पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. याप्रकरणी राणेंना उच्च न्यायालयाने १० लाखांचा दंड ठोठावला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: धारावीतून ज्योती गायकडवाड आघाडीवर

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

SCROLL FOR NEXT