bjp Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : काँग्रेस आणि ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का; ३ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Political News : काँग्रेस आणि ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसला आहे. कोकणतील ३ बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

अमोल कलये

सिंधुदुर्गात भाजपने काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

सिंधुदुर्गातील तीन महत्त्वाच्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

नितेश राणे यांची सिंधुदुर्गातील भाजप मेळाव्यात प्रमुख उपस्थिती

भाजपच्या राजेश सावंत यांनी दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्याने सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या निवडणुकीसाठी भाजपनेही जोरदार कंबर कसली आहे. भाजपने कोकणातील सिंधुदुर्गात मंत्री नितेश राणे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. या निवडणुकीतच सिंधुदुर्गात भाजपने काँग्रेस आणि ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. सिंधुदुर्गातील तीन नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात महत्त्वाचा पक्ष प्रवेश सोहळा झाला. यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष विकास सावंत यांचे पुत्र विक्रांत सावंत, ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, शिवसेना शिंदे गट जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, नितेश राणे यांनी उपस्थिती दर्शवली आहे. या मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष स्वबळाची घोषणा करणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. सिंधुदुर्गात स्वबळाचे संकेत मिळाल्यास राणे विरुद्ध राणे असा रंगणार सामना असल्याचे बोललं जात आहे.

राजेश सावंत यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

दुसरीकडे भाजपचे दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुलीच्या प्रेमापोटी सावंत यांनी राजीनामा दिला. राजेश सावंत यांची मुलगी शिवानी माने या ठाकरे गटाकडून रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत. मात्र, पक्षाशी एकनिष्ठ राहून भाजपच्या उमेदवाराचं काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Parliament Winter Session: लोकसभेत गोंधळात 'G Ram G' विधेयक मंजूर, विरोधकांनी फाडल्या विधेयकाच्या प्रती

Face Care: चेहऱ्यावर अ‍ॅलोव्हेरा जेल लावल्याने चेहरा फक्त ग्लो होत नाही तर 'हे' त्रासही होतात कायमचे दूर

ज्ञान पाजळणाऱ्या पुणेकरांना परदेशी नागरिकानं शिकवला धडा|VIDEO

माझ्या बायकोला घरी पाठवा हो....सासूच्या पायावर लोटांगण घालून जावई धायमोकळून रडू लागला, Viral Video बघून काय म्हणाल?

SCROLL FOR NEXT