Pune University mess license was cancelled Saam Tv
मुंबई/पुणे

Pune University: मोठी बातमी! पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द, तुकाराम मुंढेंची धडक कारवाई

Pune University mess license was cancelled: पुणे विद्यापीठाच्या मेसचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. तुकाराम मुंढे यांनी ही मोठी कारवाई केली. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

Priya More
  • पुणे विद्यापीठातील मेसचा परवाना निलंबित

  • विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर FDA ची तपासणी

  • स्वच्छता आणि अन्न गुणवत्तेत गंभीर त्रुटी आढळल्या

  • तुकाराम मुंढे यांची धडक कारवाई

अक्षय बडवे, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द करण्यात आला आहे. एफडीएचे (अन्न व औषध प्रशासन) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हे आदेश दिले आहेत. विद्यापीठाच्या उपहारगृहाचे व्यवस्थापन करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात सुद्धा कठोर कारवाई करण्याचे आदेश विभागानं दिल्यानंतर पुढील नवीन कंत्राटदार येण्यापर्यंत मेस बंद ठेवण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या परिसरात असणाऱ्या या कॅन्टीनबाहेर "८ नंबर मेस सुरू आहे" असा फलक लावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया तसेच इतर माध्यमातून विद्यापीठातील कॅन्टीन तसेच मेसमध्ये निकृष्ट दर्जाचे आणि आरोग्यासाठी असुरक्षित अन्न पदार्थ मिळत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. याबाबत विद्यापीठात शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी थेट एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना सुद्धा पत्र लिहून कळवले होते.

प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे अन्न सुरक्षा विभागाने विद्यापीठातील मेसमधील जेवणाचे, पाण्याचे नमुने तपासणीसाठी जप्त केले होते. एफडीएने केलेल्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळून आल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) परिसरातील कँटीनचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला.

एफडीएने केलेल्या तपासणीत अन्नसाठा, तापमान नियंत्रण, स्वच्छता मानकांचे पालन, किटक नियंत्रण व्यवस्था तसेच अन्न हाताळणी प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणा आढळून आला असल्याची माहिती एफडीएमधील अधिकाऱ्यांनी दिली. याशिवाय, पाण्याच्या गुणवत्तेच्या नोंदी आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी अहवालाचाही अभाव असल्याचे उघड झाले आहे.

या गंभीर त्रुटींमुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या उपहारगृहाचे संचालन करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात सुद्धा कठोर कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट उद्या दुपारी वाहतुकीसाठी राहणार बंद

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT