Bhiwandi saam
मुंबई/पुणे

Bhiwandi News: ह्रदयद्रावक! साखर झोपेत असतानाच स्लॅब कोसळला; ६ महिन्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू, आई गंभीर जखमी

Bhiwandi building collapse: छताचे प्लास्टर कोसळल्यामुळे एका चिमुकल्याचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर, बाळाची आई गंभीर जखमी झाली आहे. ही घटना भिवंडीतील नायगाव परिसरात घडली आहे.

Bhagyashree Kamble

छताचे प्लास्टर कोसळल्यामुळे एका चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही ह्रदयद्रावक घटना भिवंडी शहरातील नायगाव परिसरात घडली आहे. या दुर्घटनेत मुलाची आई गंभीर जखमी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. चिमुकल्याच्या आईवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे भिवंडीतील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या देखभालीबाबत प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

भिवंडी शहरातील नायगाव परिसरात अन्सारी अपार्टमेंट आहे. त्याच्या तळमजल्यावर एक कुटुंब राहत आहे. आज पहाटे या इमारतीत एक अपघात घडला. घरात आई आणि बाळ साखर झोपेत असताना त्यांच्यावर छताचे प्लास्टर कोसळले. या अपघातानंतर त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मात्र, उपचारादरम्यान, ६ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर, बाळाची आई गंभीर जखमी असून, तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास शांतीनगर पोलिसांकडून सुरू आहे. तसेच नागरिकांनी भिवंडीतील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या देखभालीबाबत, तसेच प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

भिवंडी महानगरपालिका प्रभाग समिती १ मध्ये अनेक जुन्या इमारती आहेत. ज्या धोकादायक स्थितीत असून, त्यांचे वेळोवेळी तपासणी आणि दुरुस्ती होत नाही. परिणामी, अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी धोकादायक इमारतींची तत्काळ तपासणी करून सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरकार कर्ज मुक्ती कधी करणार? उद्धव ठाकरेंचा शासनाला रोखठोक सवाल

Kidney Health: किडनी खराब होण्याची ५ महत्त्वाची लक्षणे, दुर्लक्ष केल्यास होतील गंभीर आजार

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भायखळ्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड; मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या| VIDEO

Bigg Boss 19: भैया से सैयां...; विकेंड का वारमध्ये सलमान खाननेच केली तान्या मित्तलची पोलखोल

Shocking News : रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; नातेवाईकाचं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT