Bhiwandi Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Bhiwandi Fire: भिवंडीत प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग

Bhiwandi Plastic Company Fire: ही आग इतकी भीषण आहे की परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Priya More

फैय्याज शेख, भिवंडी

भिवंडीमध्ये (Bhiwandi) प्लास्टिकच्या कंपनीला (Plastic Company) भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ही आग इतकी भीषण आहे की परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीच्या सोनाळे गावातील राजलक्ष्मी हायटेक या इंडस्ट्रियल पार्कमधील प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागली. साडेसहाच्या सुमारास कंपनीला अचानक आग लागली. या कंपनीमध्ये प्लास्टिकचे पंखे बनवण्यात येत होते. या आगीमध्ये कंपनी जळून खाक झाली. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.

राजलक्ष्मी हायटेक या इंडस्ट्रियल पार्कमधील एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर Hicool ही प्लास्टिक पंखे बनवणारी कंपनी आहे. या कंपनीत अचानक आग लागली. पाहता पाहता आग भडकत गेल्याने संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट परसरले होते. आग नियंत्रणात आली आहे. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी आणि कोणी जखमी झाले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah : राजकीय निवृत्तीनंतर काय करणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितला प्लान

Virat Kohli : कसोटीतून निवृत्ती का घेतली? विराट कोहलीनं विचित्र कारण सांगितलं, म्हणाला, जेव्हा ४ दिवसांत दाढी...

Maharashtra Live News Update : अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस

Pune News : 'स्पा सेंटरमध्ये फक्त स्पा चालू ठेवा, अन्यथा...' पुणे पोलिसांचा मालकांना सज्जड दम

Vande Bharat : नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त ठरला; कुठे कुठे थांबणार? तिकिट किती? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT