Bhiwandi Kamvari River Two Brothers Drown & Death  Saam Tv News
मुंबई/पुणे

Bhiwandi News : दोघेही घराबाहेर पडले, पोहण्यासाठी पाण्यात उतरले अन् आक्रित घडलं; दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

Bhiwandi Kamvari River Two Brothers Drown & Death : भिवंडी तालुक्यातील गोरसई येथे कामवरी नदीत दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

Prashant Patil

कल्याण : पुण्यातील मावळ येथील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीत पूल कोसळून पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेला १० दिवसही पूर्ण होत नाही तोवर भिवंडीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भिवंडी तालुक्यातील गोरसई येथे कामवरी नदीत दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सागर परशुराम धुमाळ (वय ३०) आणि अक्षय परशुराम धुमाळ (वय २५) असं बुडून मृत झालेल्या भावांची नावं आहेत. घटनास्थळी भिवंडी पालिका आपत्तीव्यवस्थापन तसेच अग्निशामक पथकाकडून दोघांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यात तीन तरुण बुडाले

रायगड जिल्ह्यातील नागोठणे नजीक बेणसे सिध्दार्थ नगर येथील शेत तलावात पोहण्यासाठी गेलेले तीन तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. वेळेत बचाव कार्य करीत तीनही तरूणांना पाण्याबाहेर काढण्याकामी यश आले असून नागोठणे येथील रिलायन्स रुग्णालयात प्रथोमोपचार करून पुढील उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटल पेणे येथे पाठवण्यात आलं आहे. जोहेब अत्तार (वय १७), मिझान अत्तार (वय १४) आणि अश्फाक अली (वय १६) अशी या तिघांची नावे असून तीनही तरुणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे अॅक्टिव्ह नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती?

SCROLL FOR NEXT