BHIWANDI DARGAH CASE saam tv
मुंबई/पुणे

उपचारासाठी दर्ग्यात गेली, पण अत्याचाराला बळी पडली; मौलवीचा महिलेसोबत संतापजनक प्रकार

Bhiwandi Woman Alleges Assault By Maulvi During Treatment Rituals: भिवंडीत उपचाराच्या नावाखाली ३० वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार केली. मौलवीला अटक करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

फैय्याज शेख, साम टीव्ही

भिवंडी: आजार बरा करून देण्याच्या नावाखाली जंतर-मंतर आणि तंत्र-मंत्राचा उच्चार करत ३० वर्षीय महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार भिवंडी शहरातील एका दर्ग्यातून समोर आला आहे. विशेष म्हणजे, आरोपी कोणी दुसरा नाही तर याच दर्ग्यांमधील मौलवीने केला आहे. मौलवीने उपचाराच्या नावाखाली महिलेचे व्हिडिओ कॉलद्वारे चित्रीकरण केल्याचा तसेच तिच्यावर झालेल्या अत्याचाराचेही व्हिडिओ तयार केल्याचा आरोप आहे. हे व्हिडिओ व्हायरल झाल्याचे सांगितल्यानंतर पीडित महिलेने भिवंडी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मोहम्मद इस्माईल वारीस शेख (५०) या मौलवीला भायखळा रेल्वे स्थानकातून ताब्यात घेत अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका खासगी रुग्णालयात असिस्टंट म्हणून काम करते. ती एका आजाराने त्रस्त असल्याने नातेवाईकांनी उपचारासाठी भिवंडीच्या दर्ग्यामध्ये मौलवी मोहम्मद इस्माईल वारीस शेख याच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार महिला २०२४ साली दर्ग्यात गेली होती. आजार बरा करण्याचे आश्वासन देत आरोपीने महिलेला जंतर-मंतर आणि तंत्र-मंत्रच्या नावाखाली विविध विधी करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. याच दरम्यान महिलेचे बांधलेले केस सोडून लिंबू कापणे आणि इतर अघोरी प्रकार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. उपचाराच्या नावाखाली महिलेच्या गुप्तांगाला हात लावण्याचा प्रकार सुरू असताना महिलेने त्याला विरोध केला. परंतु या मौलवीने ही विधी करावीच लागेल असे सांगितले.

त्यानंतर रात्री महिलेचे व्हिडिओ कॉलद्वारे चित्रीकरण करण्यात आले. उपचारासाठी या माैलवीने तिला रात्री दर्ग्यात बोलावले आणि पूजेचे विधी सांगत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. एवढेच नव्हे तर शरीर संबंधाचे व्हिडिओ तयार करण्यात आले आणि हाच व्हिडिओ व्हायरल झाल्याचे बाबाने तिला फोन द्वारे सांगितले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे समजल्यानंतर महिला घाबरली आणि तिने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिला रात्री दर्ग्यात बोलावून घेत उपचाराच्या नावाखाली तिच्यावर जबरदस्ती केली. सलग काही दिवस हा प्रकार सुरू असल्याचा आरोप महिलेने केला आहे.

शरीर संबंधाचा व्हिडिओ देखील तयार करण्यात आला आणि हा व्हिडिओ व्हायरल  करण्यात आला. या प्रकारामुळे त्रस्त झाल्यानंतर तिने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ मधील कलम ३, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६ ई आणि ६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी मौलवी उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी भायखळा रेल्वे स्थानकावर त्याच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणातील कथित व्हिडिओ नेमके कोणी तयार केले, ते कुठे आणि कसे व्हायरल झाले. तसेच या प्रकरणात मौलवीसोबत आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास भिवंडी शहर पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सोमवार ठरणार भाग्याचा! ‘या’ 6 राशींना नोकरी-व्यवसायात मोठा फायदा; वाचा उद्याचे राशीभविष्य

Vangi Kaap: चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत आणि चविष्ट वांगी काप; वाचा सोपी रेसिपी

अभिजीत दीपकेंचं महाराष्ट्रात आंदोलन सुरू; मोठ्या संख्येने Gen-Z रस्त्यावर, सरकारचं टेन्शन वाढलं

मनोज जरांगेंनंतर आता 'या' नेत्याची मैदानात उडी! १ सप्टेंबरला 'चलो मुंबई'ची घोषणा, राज्य सरकारची डोकेदुखी वाढणार

Telangana Politics: सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरात तंत्र-मंत्र विधी; मुख्यमंत्र्यांच्या आरोपानं खळबळ

SCROLL FOR NEXT