Bhiwandi Crime News Saam T V
मुंबई/पुणे

Bhiwandi Crime: पळून जाऊन लव्ह मॅरेज केलं, पोलिसांच्या ताब्यात असताना तरुणाचा मृत्यू, जाणून घ्या काय घडलं?

Youth Died In Train Accident: भिवंडी तालुक्यातील पडघा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. एका २५ वर्षीय तरुणाचा पोलिसांच्या ताब्यात असताना रेल्वे अपघातात मृत्यू झाला.

Priya More

पोलिसांच्या ताब्यात असताना रेल्वेमधून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडी तालुक्यातील पच्छापूर येथे ही घटना घडली. तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी पोलिसांवर आणि मुलीच्या नातेवाईकांवर संशय व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील पडघा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. एका २५ वर्षीय तरुणाचा पोलिसांच्या ताब्यात असताना रेल्वे अपघातात मृत्यू झाला. या तरुणाने पळून जाऊन प्रेम विवाह केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. मध्य प्रदेशवरून या तरुणाला घेऊन पोलिस राजधानी एक्स्प्रेसने येत होते. त्याचवेळी रेल्वेमधून पडून तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

घरच्यांवर आणि पोलिसांवर मुलाच्या कुटुंबीयांनवर मृत्यू प्रकरणी दोषी असल्याचा आरोप केले आहेत. अनिकेत जाधव (२४ वर्षे) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच्छापूर येथे अनिकेत जाधव राहत होता. अनिकेतचे वाशिंद येथील नात्यातील अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. दोघांनी देखील पळून जाऊन लग्न केले आणि मध्य प्रदेशमध्ये राहत होते.

वाशिंद पोलिसांना अनिकेत मध्यप्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यांनी मध्य प्रदेशातील पोलिसांच्या मदतीने त्या दोघांना शोधले. दोघेही सापडल्याची माहिती मिळताच मुलीच्या नातेवाईकांनी मध्य प्रदेश येथील पोलिस ठाण्यात धाव घेतली. वाशिंद पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आणि ते मध्य प्रदेशातून त्यांना घेऊन महाराष्ट्रात येत होते.

पोलिसांच्या ताब्यात असतानाही राजधानी एक्स्प्रेसमधून पडून अनिकेतचा मृत्यू झाला. अनिकेतच्या नातेवाईकांनी त्याचा मृत्यू मुलीच्या नातेवाईकांमुळे झाल्याचा आरोप केला. पोलिसांच्या ताब्यात असताना सुद्धा अनिकेचा रेल्वे अपघातात मृत्यू होणे एक संशयास्पद असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी अनिकेच्या कुटुंबीयांनी केले आहे. पोलिसांनी आणि मुलीच्या घरच्यांनी अनिकेतची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अनिकेत ज्या दिवसापासून पळून गेला होता त्या दिवसापासून वाशिंद पोलिसांनी आम्हाला नाहक मानसिक त्रास दिल्या असल्याचा आरोप अनिकेतच्या भावाने केला आहे. याबाबत सखोल चौकशी न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपाइंचे किरण चन्ने यांनी दिला आहे. तर या घटनेविषयी पोलिसांची प्रतिक्रिया विचारले असता पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: आर्थिक लाभाच्या संधी मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना पैसा जपून वापरण्याचा सल्ला; वाचा शनिवारचे राशीभविष्य

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

SCROLL FOR NEXT