Bhiwandi factory Fire Saam TV
मुंबई/पुणे

Bhiwandi Fire News: भिवंडीत डायपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट

Bhiwandi factory Fire : भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी परिसरातील डायपर बनवणाऱ्या कंपनील भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले आहेत.

Satish Daud

भिवंडी तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सरवली एमआयडीसी परिसरातील डायपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहे.

अग्निशमन दलाच्या जवान सध्या आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. मात्र, आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यात सरवली एमआयडीची परिसरात सदाशिव हायजिन प्रा.ली ही डायपर बनवण्याची कंपनी आहे.

मंगळवारी पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास कंपनीला अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण करत संपूर्ण कंपनीला विळखा घातला. सुदैवाने कंपनीतील कर्मचारी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली.

आग इतकी भीषण होती, की परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे आग विझवण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. आग नेमकी कशामुळे लागले याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT