Bhiwandi Latest News:  Saamtv
मुंबई/पुणे

Bhiwandi News: अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या पथकावर फेरीवाले- दुकानदारांचा हल्ला; पोलिसांकडून सौम्य लाठीमार

Bhiwandi Latest News: अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या पालिका पथकावर दुकानदार फेरीवाल्यांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीमधून समोर आला आहे

Gangappa Pujari

फैय्याज शेख, प्रतिनिधी

Bhiwandi News:

अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या पालिका पथकावर दुकानदार फेरीवाल्यांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीमधून समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला, त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भिवंडी (Bhivandi) महानगरपालिका हद्दीतील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण पाहायला मिळत आहे. प्रभाग समिती क्रमांक एक अंतर्गत येत असलेला बाग ए फिर्दोस ते बाला कंपाऊंड या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मोहिम काल प्रभाग अधिकारी सुदाम जाधव यांनी हाती घेतली.

रस्त्या लगतच्या फूटपाथवरील दुकानांचे अतिक्रमण तसेच रस्त्यावरील हातगाड्या हटवण्यासाठी सुदाम जाधव हे अतिक्रमण पथक व पोलिसांसह या ठिकाणी आले होते. यावेळी काही संतप्त दुकानदार व फेरीवाल्यांनी पालिका पथकावर दगडफेक करीत हल्ला चढवला. परंतु त्यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत जमाव पांगवला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी फेरीवाले व दुकानांपुढील अतिक्रमणावर जोरदार कारवाई केली आहे. विशेष बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वी शहरातील कामतघर ताडाळी ता रस्त्यावर सुध्दा अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या पथका वर फेरीवाले दुकानदार यांनी हल्ला केला होता. त्यामुळे शहरातील फेरीवाले दुकानदार यांचे अतिक्रमण हटविण्याचे आव्हान पालिका प्रशासना समोर उभे ठाकले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कांदा भजी खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा फणसाची भजी, सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: युरिया खतांसाठी शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र दुकानादारांमध्ये वाद

LPG Cylinder Price: एलपीजी सिलेंडर ६५८ रुपयांनी स्वस्त मिळतोय, १०.५८ कोटी कुटुंबांना ९५८ रुपयांचा बंपर फायदा, पाहा नेमकं गणित

Weekly Horoscope: या राशींनी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं; वाचा तुमचं साप्ताहिक राशीभविष्य

भल्या पहाटे ८.२ तीव्रतेच्या भूकंपाने जमीन हादरली, 'या' देशाला त्सुनामीचा इशारा

SCROLL FOR NEXT