BHIWANDI BUILDING COLLAPSE: 10 DEAD, CONTRACTOR NEGLIGENCE SPARKS OUTRAGE saam tv
मुंबई/पुणे

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

Tragedy in Bhiwandi: आता बातमी भिवंडीतून....धोकादायक इमारत कोसळल्यामुळे भिवंडीत मृत्यूचं तांडव पाहायला मिळालंय...या दुर्घटनेमुळे किती कुटुंब उद्ध्वस्त झाली? नेमक्या कुणामुळे ही इमारत दुर्घटना झाली? कोण याला जबाबदार आहे? यावरचा हा विशेष रिपोर्ट....

Suprim Maskar

काळीज पिळवटून टाकणारा हा आक्रोश आहे... भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांचा....भिंवडीच्या गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर अपार्टमेंट ही 4 मजली इमारत मध्यरात्री कोसळली...या दुर्घटनेत एक दोन नव्हे तर तब्बल 10 जणांना आपला जीव गमवावा लागलाय...एकाच कुटुंबातील दोन्ही भावांचा या दुर्घटनेत दुर्देवी मृत्यू झाल्यानं कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय...मुळात महापालिका प्रशासनानं काही दिवसांपूर्वी या इमारतीच्या दुरुस्तीसाठी नोटीस पाठवली होती... मात्र अनुभव शुन्य कॉन्ट्रॅक्टरनं अक्कल गहाण ठेवून एकाच वेळी इमारतीचे 3 पिलर तोडल्यानं ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय..

विशेष म्हणजे भिवंडीतील ही इमारत कोसळल्यानंतर इमारतीपर्यंत जाण्यासाठी NDRF ला कुठलाच रस्ता नव्हता... त्यामुळेच इमारतीशेजारील चाळ पाडण्यात आली... ज्यामुळे चाळीतील रहिवाशांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्क केलाय...

दरम्यान मंत्री गिरीश महाजनांनीही या इमारत परिसरातील बचावकार्याची पाहणी केली... त्यानंतर ठेकेदारानं महापालिकेकडून दुरुस्तीसाठी कुठलीच परवानगी घेतली नसल्यानं हा प्रकार घडल्याचं समोर आलंय. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी पालिका आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे धोकादायक इमारतीमुळे क्लस्टर डेव्हल्पमेंटचा मुद्दा भिवंडीच्या खासदारांनी पुढे आणलाय...

दुसरीकडे या दुर्घटनेनंतर भिवंडी महापालिका क्षेत्रातील इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय...भिंवडीत हजारो इमारती धोकादायक स्थितीत असल्यानं तब्बल 30 हजार नागरिकांचा जीव टांगणीला लागलाय...

भिवंडीत 30 हजार नागरिक धोक्यात-

धोकादायक इमारती - 1444

अतिधोकादायक इमारती - 289

पाडलेल्या अतिधोकादायक इमारती - 69

धोकादायक इमारतींमध्ये राहणारी कुटूंब - 6041

धोकादायक इमारतीतील रहिवाशी - 30 हजारहून अधिक

केवळ भिवंडीच नव्हे तर संपूर्ण एमएमआर परिसरात अनधिकृत बांधकामांच्या सुळसुळाटामुळे अशा घटना सातत्यानं घडताय.... याआधी विरारमध्ये झालेली दुर्घटना ताजी आहे...आता भिवंडीतही हाच प्रकार घडलाय. ठेकेदाराचा मनमानी कारभार आणि महापालिकेतील अधिकाऱ्याचं साटंलोटं यामुळे निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागलाय... मात्र अनुभव शुन्य ठेकेदाराची नेमणूक कोणी केली? नोटीस पाठवणाऱ्या पालिका प्रशासनानं अनाधिकृतपणे सुरु असलेल्या दुरुस्तीच्या कामावर लक्ष का ठेवलं नाही? असे अनेक गंभीर प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poha Side Effects : रोज पोहे खाताय? मग सावधान! ब्लड शुगरसह 'या' ३ गंभीर समस्यांचा वाढतो धोका

Maharashtra News Live Update: ST महामंडळाच्या ऑडिटवरून भाजप शिंदेसेना संघर्ष पेटणार

Ladki Bahin Yojana : ₹१५०० की ₹३०००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात या महिन्यात किती पैसे येणार? पाहा अपडेट

Rava Khobryache Modak Recipe : ना उकड, ना जास्त मेहनत! फक्त २ पदार्थांत बनवा गणरायाचे आवडते रवा-खोबऱ्याचे मोदक

Vidyanand Bapat: श्रद्धेचा अवमान नको! विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस; ४८ तासांत बिनशर्त माफीची मागणी

SCROLL FOR NEXT