दुसऱ्या सोमवारी देखील भिमाशंकरची यात्रा भक्तांविनाच... रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

दुसऱ्या सोमवारी देखील भिमाशंकरची यात्रा भक्तांविनाच...

दरवर्षी श्रावण महिन्यात लाखोंच्या संख्येने शिवभक्त भिमाशंकरला हजेरी लावतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोहिदास गाडगे

पुणे - आज श्रावण Shravan महिन्यातील दुसरा सोमवार आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकरला Bhimashankar पहाटेचा महाभिषेक,आरती झाल्यानंतर शिवलिंग विविध रंगाच्या फुलांनी सजविण्यात आले. ॐ नम:शिवाय म्हणत दरवर्षी श्रावण महिन्यात लाखोंच्या संख्येने शिवभक्त भिमाशंकरला हजेरी लावतात.

मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांविना श्रावण महिन्यातील भिमाशंकरची यात्रा सुरु आहे. शिवभक्तांविनाच श्रावण महिन्यातील उत्सव धार्मिक परंपरांचे जतन करत सुरु आहे.

हे देखील पहा -

डोंगराळ आदिवासी भागातील नागरिकांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर परिसरात, हार,फुले,प्रसाद,धार्मिक साहित्य,खेळणी अशा विविध वस्तूंच्या विक्रीची बाजारपेठ उभी राहिली.मात्र हिच बाजारपेठ गेल्या दीड वर्षापासून बंद ठेवण्यात आली आहे.

मागील दिड वर्षांपासून भिमाशंकर मंदिर बंद असल्याने या परिसरातले असंख्य व्यवसाय बंद पडले आहे. अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह याच दुकानांवर अवलंबुन आहे. मात्र पुन्हा श्रावण मासातील व्यवसायाच्या वेळेतच संचारबंदी लागू असल्याने येथील दुकाने बंद ठेवली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ola Uber Fare Hike: ओला- उबरचा प्रवास महागला! भाड्यात मोठी वाढ, प्रवाशांच्या खिशाला फटका

Local Body Election: मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीनंतर फुटणार, किती टप्प्यात होणार निवडणूक?

Diabetes Paitent: मधुमेह रूग्णांनी हे ५ पदार्थ कधीही खाऊ नयेत, रक्तातील साखर वाढते

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या 60 कोटी फसवणूक प्रकरणात बॉलीवूड सेलिब्रिटींची होणार चौकशी; 'या' अभिनेत्रींना पाठवली नोटीस

नाशिककरांनो पाणी जपून वापरा, शनिवारी शहरात पाणी नाही, रविवारीही.. नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT