Chandrasekhar Azad Saam tv
मुंबई/पुणे

Chandrashekhar Azad: 'भाजपला रोखले नाही तर...'; चंद्रशेखर आझाद यांची टीका

रोहिदास गाडगे

Chandrashekhar Azad On BJP:

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी संविधानाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'भाजपला रोखले नाही तर भारताचे संविधान संपवेल, अशी टीका चंद्रशेखर आझाद यांनी केली. संविधान वाचविण्यासाठी बाबासाहेब यांच्या विचाराच्या लोकांनी एकत्र यावे हवं, असं भावनिक आवाहन चंद्रशेखर आझाद यांनी केलं. (Latest Marathi News)

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान चंद्रशेखर आझाद यांनी कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला भेट दिली. या भेटीनंतर चंद्रशेखर आझाद यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आझाद यांनी भाजपवर कडाकडून निशाणा साधला.

चंद्रशेखर आझाद यांची भाजपवर टीका

चंद्रशेखर आझाद म्हणाले, 'आता सर्वांनी एकजूट करून भाजपची सत्ता उलथून टाकली पाहिजे. आजपासून विरोधी पक्षांनी कोरेगाव भीमाच्या भूमीतून भाजपला पराभूत करण्याचा विडा उचलायला हवा. भाजपने विरोधी पक्षांची तोडफोड करून लोकशाहीची हत्या करून महाराष्ट्रात सत्ता आणली आहे. मात्र यामुळे जनता भाजपसोबत नाही'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजप देशातील पैसा लुटून पळून जातेय: चंद्रशेखर आझाद

'एकीकडे महागाई बेरोजगारी ,शेतकऱ्यांचे प्रश्न ,महिला अत्याचार ,युवकांना रोजगार यावर विचार करण्याची वेळ आली आहे. भाजप देशातील पैसा लुटून पळून जात आहे. यावर चर्चा करण्याची वेळ आली आहे. गुलामीतून मुक्ती मिळविण्यासाठी आमच्या पूर्वजांनी लढाई केली होती. त्यासाठी आम्ही शौर्य दिन साजरा करतो, मात्र ज्या प्रकारे आरएसएस आणि भाजप देशाला गुलाम बनवायला लागले आहेत, असेही ते म्हणाले.

बाबासाहेबांना मानणारे लोक गप्प का ? आझाद यांचा सवाल

'संसदेतील १४० पेक्षा जास्त खासदार यांनी निलंबित केले आहेत. आपल्या मनाप्रमाणे कायदे बनविले जातात ही लोकशाहीची हत्या आहे. बाबासाहेबांना मानणारे लोक गप्प का आहे, असा प्रश्न आझाद यांनी केला आहे. ज्या प्रकारे सुभाष चंद्र बोस यांनी नारा दिला होता, 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हे अझादी दुंगा' अशी वेळ आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

SCROLL FOR NEXT