Bhayandar Marriage News Saam Tv
मुंबई/पुणे

Bhayandar Marriage News: नवरदेव मंडपात वाट पाहत उभा, नवरी अचानक लिफ्टमध्ये अडकली अन्.... भाईंदरमधील थरारक घटना

नवरी विवाहस्थळी पोहोचण्यासाठी निघाली होत. पण लिफ्टमध्ये असताना अचानक लिफ्ट बंद पडली आणि सगळ्यांचाच जीव टांगणीला लागला.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

Bhayandar Marriage News: लग्नाचा मुहूर्त जवळ येत चालला होता तर दुसरीकडे पाहुण्यांची लगबग सुरू होती. नवरदेव देखील लग्नामंडपात आपल्या नवरीची वाट बघत बसला होता. नवरी विवाहस्थळी पोहोचण्यासाठी निघाली होत. पण लिफ्टमध्ये असताना अचानक लिफ्ट बंद पडली आणि सगळ्यांचाच जीव टांगणीला लागला. (Latest Marathi News)

घटनेची माहिती अग्निशनम दलाच्या जवानानांना देण्यात आली. त्यानंतर अग्निशनम दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत २० मिनिटांनंतर लिफ्टमध्ये अडकलेल्या नवरीला सुखरूप बाहेर काढलं. ही घटना काल रात्री आठच्या सुमारास घडली आहे. मुहूर्तापूर्वी हे बचाव कार्य यशस्वी झालं आणि लग्न सुखरूप पार पडलं.

प्रिती वागळे या तरुणीचं सोमवारी (२९ मे) लग्न (Marraige) होतं. भाईंदर (Bhayandar) पश्चिमेच्या विनायक नगर येथील एका सभागृहात हा लग्न सोहळा सुरू होता. रात्री ९ चा मुहूर्त होता आणि सगळे जण नवरी मुलीची वाट पाहत होते.

नवरी मुलगी देखील आपल्या तीन बहिणी आणि दोन लहान भावांसोबत तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी निघाली. मात्र अचानक लिफ्ट (Lift) बंद पडली. ऐनवेळी लिफ्ट बंद पडल्याने कुटुंबियांचा जीव टांगणीला लागला.

या प्रसंगाची माहिती अग्निशमन दलाा मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत नवरी मुलीची आणि तिच्यासोबत लिफ्टमध्ये अडकलेल्या इतर लोकांचा सुखरूप सुटका केली आणि त्यानंतर लग्न पार पडले. लिफ्टमध्ये अडकलेल्या इथर काही लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आम्हाला घटनेची माहिती मिळताच लिफ्टमध्ये अडकलेल्या महिलांची सुखरूप सुटका केली अशी माहिती अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमा पाटील आष्टीकर यांचे निधन

Uddhav Thackeray Setback : ठाकरेंच्या शिवसेनेला जबरी धक्का, रायगडमधील शिलेदाराने साथ सोडली

Ladki Bahin Yojana: ऑगस्टचे ₹१५०० खात्यात जमा होण्यास सुरूवात, लाडक्या बहिणींनो पैसे आले का? असं करा चेक

Latur OBC News : मराठा आरक्षणासाठी GR, ओबीसी तरूणाने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीत काय लिहिले?

Karishma Sharma Accident: धक्कादायक! धावत्या मुंबई लोकलमधून अभिनेत्रीने मारली उडी; कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT