Bhandup slab collapse SAAM TV
मुंबई/पुणे

Bhandup slab collapse: भांडुपच्या खिंडीपाडा परिसरात घराचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Bhandup slab collapse: आज सकाळी घराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे

जयश्री मोरे

Bhandup slab collapse: भांडुप येथील खिंडीपाडा परिसरात आज सकाळी घराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बीएमसी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना आज सकाळी ९.४२ वाजता घडली. इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना ही घटना घडल्याचे कळतंय.

प्राथमिक माहितीनुसार, ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चरच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना ही घटना घडली. स्लॅबचा काही भाग आगांवर कोसळल्याने राजकुमार धोत्रे वय 19 वर्षे आणि रामानंद यादव वय 18 वर्षे हे दोन तरूण गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जवळच्या एमटी अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले (Tajya Batmya)

दरम्यान या संदर्भात भांडुप पोलिसांनी संबधितावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बचाव पथक, पोलिस आणि स्थानिक प्रसासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT