Bhandup Accident Tragedy News Saam Tv
मुंबई/पुणे

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Bhandup Accident Tragedy News : भांडुपमध्ये निर्माणाधीन इमारतीत भीषण अपघातात ९ जण टँकमध्ये कोसळले, त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. सुरक्षेअभावी ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे.

Alisha Khedekar

  • भांडुपमध्ये बांधकामस्थळी भीषण अपघात

  • ९ जण टँकमध्ये कोसळले; एकाचा मृत्यू

  • सुरक्षेअभावी दुर्घटना घडल्याचा आरोप

  • प्रशासनाकडून चौकशी सुरू, नागरिकांचा संताप

मयूर राणे, भांडुप

Mumbai Bhandup Accident Tragedy भांडुपमधील जनता मार्केट परिसरात एक निर्माणाधीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून नऊ जण खाली कोसळल्याची घटना काल रात्री घडली आहे. या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून इतर जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळाच्या बाजूला सुरु असलेल्या लग्नकार्यात एका मुलीची छेड काढण्यात आली. या घटनेतील आरोपीला काढण्यासाठी गेले असता हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल म्हणजेच गुरुवारी ११:३० च्या सुमारास मातेश्वरी हॉल काका पेट्रोल पंपच्या मागील बाजूस सुरू असलेल्या लग्न समारंभात एका मुलीची छेड काढण्यावरून वादविवाद झाला. सदर छेड काढणाऱ्या अनोळखी मुलाला पकडण्यासाठी काही इसम त्याच्या मागे गेले . सदर इसम श्रद्धा कन्स्ट्रक्शन बिल्डिंग येथे ग्राउंड फ्लोअर येथून दुसरीकडे गेला असता त्याला शोधण्यासाठी त्याच्या मागे लग्नातील काही इसम त्याच्या मागे पळू लागले.

याच वेळी निर्माणाधीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक लाकडी फळीने तसेच पत्र्याने झाकलेली एसटीपी वॉटर टँक होता. या टँकवर नकळतपणे एका तरुणांचा पाय पडला आणि तो टँकच्या आतमध्ये पडला.टँकमध्ये पडलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी इतर तरुणांनी त्यामध्ये उडी मारली आणि अडकले. सदर घटनेत एकूण सहा लग्नातील व्यक्ती व तीन बांधकाम कामगार असे ९ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि स्थानिक महापालिका कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचावकार्य हाती घेत जखमींना बाहेर काढून विविध रुग्णालयांमध्ये हलवले.

या अपघातात २५ वर्षीय भालचंद्र फले यांचा मृत्यू झाला. त्यांना फोर्टिस रुग्णालय येथे नेण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जखमींची प्रकृती ठीक असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

बांधकाम सुरू असलेल्या जागी योग्य सुरक्षाव्यवस्था नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. उघडे खड्डे, अपुरी प्रकाशयोजना आणि कोणतीही इशारा फलक नसल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी केली जाणार असून, निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षेसाठी बांधकाम स्थळांवर कडक नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Update : मुंबईकरांची चिंता वाढली! पाऊस लांबला, धरणांनी तळ गाठला; सातही धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा शिल्लक?

Maharashtra News Live Update: हरामखोर गेले पण शिवसैनिक हलला नाही - उद्धव ठाकरे

July 1 Rule Change : १ जुलैपासून देशात 5 मोठे बदल; LPG, ATM ते HDFC कार्डधारकांवर होणार थेट परिणाम

केतन अगरवाल हत्या प्रकरणात थेट क्रिकेट कनेक्शन समोर; पोलिसांनी दिली महत्वाची माहिती

Weight Loss: फक्त डाएट नाही, तर वजन कमी करण्यासाठी या 7 गोष्टीही दररोज केल्या पाहिजेत

SCROLL FOR NEXT