भामा-आसखेड प्रकल्प; कोर्टाच्या आदेशाला राज्य सरकारची केराची टोपली? Saam TV
मुंबई/पुणे

भामा-आसखेड प्रकल्प; कोर्टाच्या आदेशाला राज्य सरकारची केराची टोपली?

भामा-आसखेड धरणाच्या पुनर्वसनासाठी मरकळ आणि आळंदी परिसरातील जमिनी शेतक-यांना नोटीस न देता शासनाकडून विनामोबदला 2014 ला संपादित करण्यात आल्या.

रोहिदास गाडगे

पुणे : भामा-आसखेड धरणाच्या पुनर्वसनासाठी मरकळ आणि आळंदी परिसरातील जमिनी शेतक-यांना नोटीस न देता शासनाकडून विनामोबदला 2014 ला संपादित करण्यात आल्या. मरकळ परिसर धरणाच्या पाण्याच्या मोबदल्यात येत नसतानाही जमिनी संपादन करण्यात आलेल्या शेतक-यांनी उच्च न्यायालयात न्याय मागितला यावेळी उच्च न्यायालयाने 2019 ला निकाल देत पुनर्वसनासाठी संपादित केलेल्या जमिनीवरील शिक्के कमी करण्याचे आदेश दिले. मात्र आज पर्यंत जमिनीवरील शिक्के कमी करण्यासाठी पाठपुरावा पत्रव्यवहार करुनही शासनदरबारी उदासिनता दिसुन आल्याने आज शेतकरी आक्रमक झाले आहेत.

बळीराजाला वेठीस धरु नका म्हणत तिरंगा हाती घेऊन माऊलींच्या आळंदी महिला शेतक-यांसह नागरिक तरुण इंद्रायणी नदीच्या पात्रात उतरुन जलसमाधी घेण्यावर ठाम असल्याचे पहायला मिळत असुन इंद्रायणी घाटावर पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भामा-आसखेड धरणातील संपुर्ण पाणी पुणे शहराच्या (Pune City) पुर्व भागाला देण्यात आले. त्यामुळे शेतीला पाणी मिळणार नसल्याने आणि भामा-आसखेड धरणाला कालवा तयार करण्यात न आल्याने शेतीला पाणी मिळणार नसल्याने संपादन केलेल्या जमिनीवरील शिक्के तात्काळ काढुन घेण्यासाठी शेतक-यांचा लढा सुरु झाला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT