Devendra Fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

'त्या 2 हजार कोटीच्या घोटाळ्यात कोण कोण सहभागी? फडणवीसांनी राजीनामा द्यावा'

'देवेंद्र फडणवीस नसून देवेंद्र फसणवीस आहेत. हा घोटाळा साधारण 2013 -14 ते 2019 पर्यंतचा आहे.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे -

मुंबई : आज मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप पत्रकार परिषद घेतली त्यांनी यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावरती निशाना साधला तर फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांवरती आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना भाई जगताप (Bhai Jagtap) म्हणाले, 'एवढा श्रीमंत मंजूर असू शकतो याचे आश्चर्य वाटते, त्या मजुरांचे नाव म्हणजे प्रवीण दरेकर असं म्हणत त्यांनी दरेकरांच्या मजुर प्रकरणावरुन टीका केली.

तसंच, जवळपास 2 हजार कोटींच्या या घोटाळ्यात कोण कोण सहभागी आहेत हे शोधावं लागेल. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि तेव्हाचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तेव्हा गुन्हा दाखल का नाही केला ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हे सर्व देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील आहे. जर देवेंद्र फडणवीस यांच्यात नैतिकता असेल तर त्यांनी देखील विरोधी पक्ष नेता पदाचा राजीनामा दिला पाहिजे. कलम 199, 200, 417, 420, 468 या अंतर्गत प्रवीण दरेकर आणि त्यात सहभागी कोणी असेल तर त्याच्यावर सहकारी वर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि फडणवीस यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीही भाई जगताप यांनी यावेळी केली.

या प्रकरणात दोषी असणाऱ्या प्रत्येकाचा सज्जनतेचा बुरखा आम्ही फाडणार आहोत. प्रवीण दरेकर जेव्हा चेअरमन होते तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि ते दरवेळी त्यांना क्लीन चीट देत गेले. ते देवेंद्र फडणवीस नसून देवेंद्र फसणवीस आहेत. तसंच हा घोटाळा साधारण 2013-14 ते 2019 पर्यंतचा असल्याचंही जगताप म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

Jio Recharge Plan: कमी खर्चात जास्त सुविधा! जिओचा 70 दिवसांचा धमाकेदार रिचार्ज प्लॅन, वाचा फायदे

Bhoplyachi Bhaji Recipe : गरमागरम वडे अन् भोपळ्याच्या भाजी, संडे स्पेशल चटपटीत बेत

Rashmika Mandanna Engagement : नॅशनल क्रश रश्मिकानं गुपचूप उरकला साखरपुडा? अंगठीने वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Maharashtra Weather : गणरायाला निरोप देण्यासाठी पावसाचे आगमन, पालघरसह नाशिकला ऑरेंज अलर्ट, कुठे कसा असणार पाऊस, वाचा

SCROLL FOR NEXT