Malshej Ghat  Saam Tv
मुंबई/पुणे

माळशेज घाटात फिरायला जाताय सावधान! मग काळजी घ्या, सूचनांचे करा पालन

माळशेज घाट म्हटलं की डोळ्यासमोर येत ते म्हणजे हिरवाईने नटलेला निसर्ग आणि धो धो वाहणारे धबधबे.

रोहिदास गाडगे

पुणे - राज्यात सर्वत्र पाऊस (Rain) सुरू झालाय निसर्ग हिरवाईने नटतोय. अशातच जुन्नरच्या माळशेज परिसरात पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्याची भुरळ पडते. मात्र पर्यटनस्थळावरील धोकादायक ठिकाणांपासून पर्यटकांनी काळजी घ्यावी आणि शिस्त पाळावी असे आवाहन करण्यात येत आहे माळशेज घाट म्हटलं की डोळ्यासमोर येत ते म्हणजे हिरवाईने नटलेला निसर्ग आणि धो धो वाहणारे धबधबे.

मन प्रसन्न करणाऱ्या माळशेज (Malshej Ghat) घाट परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढील आहे. मात्र या ठिकाणवरील धोका मात्र कायम आहे. माळशेज घाट हा शिवकालीन घाट आहे. या घाटातुन मुंबई आणि जुन्नरकडे प्रवास करत असताना पावसाळ्यात अनेक वेळा दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यंदा पाऊसाळ्याच्या आधीच वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक ठिकाणी डागडुजी केली आहे. तारेच्या फेनसिंग आणि जाळ्या बसवल्यात मात्र धोका कायमच असल्याने पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणं टाळावं असे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील पाहा -

सह्याद्रीच्या कुशीतील घाटमाथ्यावर म्हणजेच मध्ये स्थिरावलाय. हिरवाईने नटलेला डोंगर, पांढऱ्या धुक्याची चादर पाहण्यासाठी पर्यटक याठिकाणी गर्दी करत असतात. पर्यटकांना माळशेजच्या निसर्गाची भुरळ पडल्याने पर्यटक गर्दी करु लागले आहे आणि पर्यटकांसाठी स्थानिक नागरिकांचे छोटे मोठे व्यवसायही उभे राहिलेत.

माळशेज घाटाची नागमोडी वळणं त्यातुन पावसाच्या सरी पर्यटकांना आनंद देणाऱ्या असल्या तरी ती ठिकाणं धोकादायकच आहे. त्यामुळे घाटात पर्यटनाचा आनंद घेत असताना पर्यटकांनी काळजी घ्यावे असे आवाहन स्थानिक नागरिक करतात. मात्र प्रशासनाने धोकादायक ठिकाणांवर थांबण्यासाठी बंदी घालण्यात आली त्या सूचनांचे पालन करावं असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Movie: 'पालतू फालतू' मध्ये दिसणार सुबोध-रिंकूची मिश्किल झलक; 'बेटर-हाफची लव्हस्टोरी' चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित

KDMC : केडीएमसी ६५ बेकायदा इमारत प्रकरण; न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाई नाही, दाखल करणार अवमान याचिका

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आठव्या वेतन आयोगावर सरकारची महत्वाची माहिती; कधीपर्यंत लागू होणार?

Crying Benefits: रडणे आरोग्यासाठी चांगले; जाणून घ्या फायदे

Monsoon Hair Care: पावसात भिजल्यामुळे केसांमध्ये येणारी दुर्गंधी कशी टाळाल? वाचा घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT