Mumbai BEST Worker Protest Saam Tv
मुंबई/पुणे

BEST Worker Protest Update: अखेर बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, मागण्या मान्य होताच केला जल्लोष

BEST Worker Protest Called Off: अखेर कंत्राटी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी संप मागे घेतला आहे.

Priya More

सचिन गाड, मुंबई

Mumbai News: मुंबईत बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी (BEST contract workers) पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मागण्या मान्य झाल्यानंतर बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी सातव्या दिवशी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे कर्मचारी आझाद मैदानावर (Azad Maidan) आंदोलनासाठी बसले होते. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी घेतला होता. अखेर त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी संप मागे घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेस्टच्या आंदोलन करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजपासून संप मागे घेत असल्याची या आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घोषणा केली आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा आठवा दिवस होता. मुंबईतल्या आझाद मैदानावर हे कर्मचारी आपल्या मुलाबाळांना घेऊन आंदोलनासाठी बसले होते.

बहुतांश मागण्या मान्य झाल्याने बेस्ट परियोजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप अखेर मागे घेतला आहे. गेले ८ दिवस या संपामुळे मोठ्या प्रमाणात बेस्टची सेवा विस्कळीत झाली होती. ज्याचा फटका मुंबईकरांना बसला होता. आता संप मिटल्याने लवकरच बेस्टची सेवा पूर्वपदावर येणे अपेक्षित आहे. गेल्या आठ दिवसांपासून बेस्टचे कर्मचारी आझाद मैदानात उपोषणाला बसले होते. आपल्या मागण्या मान्य झाल्याची घोषणा होताच संपकरी कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मान्य झालेल्या मागण्या -

- बेसिक पगारात होणार वाढ

- वार्षिक रजा भर पगारी मिळणार

- दिवाळी बोनस मिळणार

- साप्ताहिक रजा मिळणार

- वार्षिक वेतनवाढ मिळण्याची शक्यता

- कामावर येण्या-जाण्यास मोफत पास

- संपादरम्यानचा गेल्या आठ दिवसांचा पगार मिळणार

- अपघात वेळी विनाकारण त्रास होणार नाही याचं आश्वासन

- आंदोलनकर्त्यांवर कारवाई होणार नाही

- निवृत्त कामगारांना प्राधान्य न देता तरुणांना प्राधान्य मिळणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Adinath Kothare New Project: शिरगावच्या खुनाचं गुंतागुंतीचं कोडं सुटणार का? 1 मे पासून आदिनाथ कोठारे आणि पुष्कराज चिरपुटकर उलगडणार शिरगावचं रहस्य

४ टर्म आमदार राहिलेला भाजपच्या दिग्गज नेत्याचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: आमदार दिपक केसरकर यांची घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी

Pankaja Munde: पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा, बड्या नेत्याच्या विधानाने राजकारणात खळबळ

Mumbai : 'मला हिंदू मुली आवडतात...' अश्लील व्हिडिओ पाठवले, शारीरिक संबंधांची मागणी; नाशिकनंतर मुंबईत कॉर्पोरेट जिहाद

SCROLL FOR NEXT