Mumbai News: बेस्टच्या ताफ्यात सामील होणार विजेवरील नऊशे डबल डेकर बस
Mumbai News: बेस्टच्या ताफ्यात सामील होणार विजेवरील नऊशे डबल डेकर बस - Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: बेस्टच्या ताफ्यात सामील होणार विजेवरील नऊशे डबल डेकर बस

साम टिव्ही


मुंबई : बेस्टच्या ताफ्यात विजेवरील नऊशे वातानुकूलित डबल डेकर बस दाखल होणार आहेत. बेस्ट समितीत या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी देण्यात आली आहे. दोनशेच्या वर बस या वर्षभरात मुंबईत (Mumbai) दाखल होणार आहेत. मात्र, निविदा न काढता त्या भाड्याने घेण्यात येत असल्याचा आक्षेप भाजपने (BJP) नोंदवला आहे. (BEST to incorporate nine hundred electric double deckers)

बेस्ट नवीन बस (Best Buses Mumbai) भाडेतत्त्वावर घेणार आहे. दोन कंपन्यांकडून प्रत्येकी दोनशे बस भाड्याने घेण्याचा प्रस्ताव आज बेस्ट समितीत मांडण्यात आला. त्यातील एका कंपनीने एक हजार बस पुरविण्याची तयारी दाखवली होती. त्यावर शिवसेनेचे (Shivsena) अनिल कोकीळ यांनी नऊशे बस भाड्याने घेण्याची उपसूचना मांडली. ती मंजूर करण्यात आली.

"हा करार नियमबाह्य पद्धतीने होणार आहे. या नऊशे बस चालवणार कोठे, या प्रश्‍नाचे उत्तर प्रशासनाकडे नाही. यासाठी निविदा काढण्याची गरज होती. मात्र, निविदा न काढताच हा करार करण्यात येत आहे," असा आक्षेप भाजपचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी घेतला. विकासामुळे भाजपला पोटशूळ उठला असून नाहक टीका केली जात आहे, असे प्रत्युत्तर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

सिंगल डेकरपेक्षा कमी खर्च
दोन वर्षांपूर्वी बेस्टने सिंगल डेकर बस भाड्याने घेतल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक किलोमीटरसाठी ७३ रुपयांचा खर्च येतो. या डबल डेकर बससाठी ५६ रुपये ४० पैशांचा खर्च येणार आहे. दोन कंपन्यांनी मिळून ४०० बस पुरविण्याची तयारी दाखवली होती. त्यातील एक कंपनी एक हजार बस देण्यास तयार होती. त्या कंपनीकडून सातशे बस घेण्यात येतील. दुसऱ्या कंपनीकडून दोनशे बस अशा नऊशे बस घेण्यात येतील. जर पुन्हा निविदा काढल्या असत्या तर खर्चात वाढ झाली असती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला, असे बेस्ट समितीचे अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी सांगितले.

राज्य सरकारचा निधी
महाराष्ट्र शुद्ध हवा मोहिमेअंतर्गत विजेवरील बस घेण्यासाठी एक हजार २५० कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. त्यातून या बससाठी खर्च करण्यात येणार आहे. पहिल्या वर्षात २५ टक्के बस दाखल होणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बस वाढविण्यात येतील.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नेरुळ बसमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकीचा मेल; BDDS पथकाने ६ बसची तपासणी

Onion Export News: मोठी बातमी! कांद्यावरील निर्यात बंदी हटवली; निवडणुकीच्या धामधुमीत केंद्राचा मोठा निर्णय

Bacchu Kadu Supports Raju Shetti : राजू शेट्टींच्या प्रचारार्थ बच्चू कडू मैदानात, काँग्रेससह भाजपवर साधला निशाणा

Petrol Diesel Rate 4rd May 2024: वीकेंडला घराबाहेर पडताय? जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर

Mumbai News: कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोलीस तपासात चक्रावून टाकणारी माहिती उघड

SCROLL FOR NEXT