Best Bus workers strike in wadala bus depot for salary सुमित सावंत
मुंबई/पुणे

एसटी कर्मचाऱ्यांनंतर आता बेस्ट कामगारांचा संप; अधिकाऱ्यांच्या बोलणीनंतर संप मागे

Best Bus Workers In Wadala Depot: कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न दिल्यामुळे त्या कंपनीच्या कामगारांनी बस गाड्या न चालवण्याचा निर्णय घेऊन आंदोलन केले.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात एकीकडे एसटी कर्माचाऱ्यांचा संप संपल्यात जमा होत असताना आता मुंबईतील बेस्ट बसच्या कर्मचारी हे संपाच्या (Strike) पावित्र्यात असल्याचं दिसतंय. याची प्रचिती गुरुवारी सकाळी ऐन कामाच्या वेळी आली. वडाळा आगारातील (Wadala Bus Depot) भाडेतत्वावरील बस गाड्यांच्या चालकांनी सकाळी संप पुकारला. अचानक बस (BEST Bus) चालकांनी संप पुकारल्यामुळे दादर रेल्वे स्थानकाजवळून टाटा, केईएम रुग्णालय मार्गे जाणाऱ्या बस बंद करण्यात आल्या होत्या. भाडेतत्त्वावर बसगाड्या चालवणाऱ्या एका कंपनीने कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न दिल्यामुळे त्या कंपनीच्या कामगारांनी बस गाड्या न चालवण्याचा निर्णय घेऊन आंदोलन केले. (Best Bus workers strike in wadala bus depot for salary)

हे देखील वाचा -

यानंतर बेस्टच्या प्रशासनाने सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची बोलणी केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेऊन बस गाड्या चालविण्याचा निर्णय घेतलाय. या कंपनीविरुद्ध कंत्राटामध्ये ठरलेल्या अटी आणि शर्तींनुसार कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान आता बस पुन्हा सुरू झाल्या आहेत. मात्र काही काळ अचानक बस गाड्या बंद झाल्यामुळे सकाळी कामावर पोहाचायला चाकरमान्यांना उशीर झाला.

१०० टक्के डिजिटल बसगाड्यांची घोषणा

दरम्यान कालच (२० मार्च) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बेस्ट बस सेवेत डिजिटल बसचे उद्धाटन करण्यात आले होते. बेस्ट उपक्रमाने मुंबईमध्ये १०० टक्के डिजिटल बसगाड्या सुरु करण्याची घोषणा केली असून या बसगाड्यांमधून प्रवाशांना संपूर्ण डिजिटल सेवा अनुभवता येणार आहे. यामध्ये प्रवासी बसमध्ये प्रवेश केल्यावर "टॅप इन" करुन आणि बसमधून उतरताना "टॅप आऊट” करुन आपला प्रवास करु शकतात. याशिवाय, बेस्ट (BEST) उपक्रमाच्या डिजिटल तिकीट पर्याय प्रकल्पांतर्गत सुरु करण्यात आलेल्या एनसीएमसी (NCMC) कार्ड धारकांना देखील या डिजिटल (Digital) बस सेवेचा लाभ घेता येणा आहे. या सेवेची अंमलबजावणी भारतातील परिवहन तंत्रज्ञानातील अग्रगण्य कंपनी “चलो" (Chalo) यांनी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saiyaara Box Office Collection : जगभरात 'सैयारा'ची जादू कायम, २०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

Infertility treatment: गर्भधारणेमध्ये अडथळा येत असलेल्या महिलांसाठी 'ही' थेरेपी ठरेल आशेचा किरण; पाहा काय आहे ही थेरेपी?

Denver Airport Incident : १७३ प्रवाशांना घेऊन येणाऱ्या विमानाच्या लँडिंग गियरला आग, अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली | Video

Kharadi Rave Party : मोठी बातमी! पुण्यातील रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटक, राज्यात खळबळ

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT