Navi Mumbai Belapur BJP Manda Mhatre Heart Attack Saam Tv
मुंबई/पुणे

Manda Mhatre : आमदार मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका, नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू

Navi Mumbai BJP Manda Mhatre News : बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रेंना हृदयविकाराचा सौम्य झटका आला असून त्यांच्यावर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Alisha Khedekar

  • आमदार मंदा म्हात्रेंना हृदयविकाराचा झटका

  • अपोलो रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया

  • दोन स्टेंट बसवण्यात आले

  • सध्या प्रकृती स्थिर

Navi Mumbai Belapur BJP Manda Mhatre Heart Attack बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांना काल रात्री २ :30 च्या सुमारास हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची बातमी समोर आली आहे. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री आमदार मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने नवी मुंबईतील नामांकित अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्वरित तपासणी करून त्यांच्यावर रात्रीच शस्त्रक्रिया केली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांचे सुपुत्र निलेश म्हात्रे यांनी दिली आहे.

शस्त्रक्रियेदरम्यान आमदार मंदा म्हात्रे यांच्या शरीरात दोन स्टेंट बसवण्यात आल्या आहेत. शस्त्रक्रियेनंतर आमदार म्हात्रे यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे नवी मुंबईतील राजकीय व सामाजिक वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले आहे. मंदा म्हात्रे या नवी मुंबईतील एक प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. बेलापूर मतदारसंघातून त्या विधानसभेत प्रतिनिधित्व करत असून, स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holiday: खातेधारकांनो लक्ष द्या! 13 ऑगस्टला बँका बंद की सुरू? जाणून घ्या तुमच्या राज्यातील अपडेट...

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update : आंबोली-चौकुळच्या सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त खेळ

Fitness Tips: जिमला जाण्याची गरज नाही! फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी ‘या’ ७ सवयी लावा

Mumbai Police: ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाला अटक, मुंबई पोलिस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT