BBC Documentary In TISS  Saam tv
मुंबई/पुणे

BBC Documentary In TISS : 200 विद्यार्थ्यांनी वादग्रस्त बीबीसी डॉक्यूमेंट्री पाहिली; 'पीएसएफ' विद्यार्थी संघटनेने केला दावा

बीबीसी डॉक्यूमेंट्री पाहण्यास विरोध होऊनही २०० विद्यार्थ्यांनी लॅपटॉपवर पाहिल्याचा दावा प्रोग्रेसिव्ह स्टुडंट फोरम या विद्यार्थी संघटनेने केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बडवे

BBC Documentary News : देशातील महत्वाच्या काही विद्यापीठात बीबीसी डॉक्यूमेंट्रीवरून गदारोळ सुरू आहे. हा वादग्रस्त बीबीसी डॉक्यूमेंट्रीचा वाद मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्येही येऊन पोहोचला आहे. 'टिस'मध्ये बीबीसी डॉक्यूमेंट्री स्क्रिनिंगला विरोध झाल्यानंतर २०० विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॅपटॉपवर पाहिल्याचा दावा प्रोग्रेसिव्ह स्टुडंट फोरम या विद्यार्थी संघटनेने केला आहे. (Latest Marathi News)

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये (Tiss) आज, शनिवारी वादग्रस्त बीबीसी डॉक्यूमेंट्री लॅपटॉपवर विद्यार्थ्यांनी पाहिल्याचा दावा प्रोग्रेसिव्ह स्टुडंट फोरम संघटनेकडून करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी (Students) गटागटांमध्ये डॉक्यूमेंट्री पाहतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.

वादग्रस्त बीबीसी डॉक्यूमेंट्री दाखवू नये, यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स संस्थेजवळ भाजप (BJP) युवा मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. त्यांनी आंदोलनही केलं. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर डॉक्यूमेंट्री दाखवली जाणार नाही, असं आश्वासन मिळाल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतलं. मात्र, २०० विद्यार्थ्यांनी अन्य मार्गाचा उपयोग करून डॉक्यूमेंट्री लॅपटॉपवर पाहिली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दुसरीकडे, बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगला टिसच्या प्रशासनानं नकार दिला होता. तर टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स संस्थेने बीबीसी डॉक्युमेंट्रीवरून विद्यार्थ्यांवर (Students) कारवाईचा इशारा दिला होता.

यासंबंधी विद्यार्थ्यांसाठी सूचना पत्र जाहीर केले होते. मात्र, तरीही टिसच्या २०० विद्यार्थ्यांनी लॅपटॉपवर बीबीसी डॉक्युमेंट्री पाहिली आहे. त्यामुळे टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स प्रशासन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येईल का, अशी चर्चा राजकीय-विद्यार्थी वर्तुळात सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT