Shivsena, supreme Court Saam Tv
मुंबई/पुणे

शिवसेना कुणाची?, उद्धव ठाकरेंना दिलासा; १ ऑगस्टला सुप्रीम कोर्ट सुनावणी घेणार

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने मूळ शिवसेना असल्याची मान्यता देण्याची विनंती याचिकेद्वारे केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या याचिकेवर निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टानं आज, मंगळवारी सहमती दर्शवली आहे. १ ऑगस्ट २०२२ रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील गटाने मूळ शिवसेना असल्याची मान्यता देण्याची विनंती याचिकेद्वारे केली आहे. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची, असा प्रश्न उपस्थित झाला असतानाच, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने उद्धव ठाकरे यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या याचिकेवर निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टानं सहमती दर्शवली आहे. १ ऑगस्ट रोजी ही सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी उद्धव ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी म्हणणे मांडले.

निवडणूक (Election) आयोगासमोर सुरू असलेल्या कार्यवाहीवर स्थगिती आणण्याची गरज आहे, कारण या प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुरू असलेली सुनावणी प्रभावित होईल, असे म्हणणे सिब्बल यांनी मांडले. त्यावर सु्प्रीम कोर्टाने सांगितले की, या प्रकरणातील प्रलंबित याचिकांसह या याचिकेवरही १ ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्यात येईल. तत्पूर्वी, निवडणूक आयोगाने अलीकडेच शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला पक्ष आणि निवडणूक चिन्हावरील आपापल्या दाव्यांच्या समर्थनार्थ ८ ऑगस्ट रोजी कागदपत्रे जमा करण्याचे निर्देश दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Polymer Notes : १० आणि २० रुपयांच्या नोटांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १०० कोटी नोटांबाबत संसदेत केली 'ही' घोषणा

टाटा ग्रुपमध्ये मोठी उलथापालथ! एन.चंद्रशेखरन यांचा तडकाफडकी राजीनामा; कॉर्पोरेट जगतात खळबळ

मऊ, खुसखुशीत रूमाली रोटी घरी कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update : नागपुरात भीषण अपघात, मित्राचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला जाताना दोन तरुणांचा मृत्यू

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेत ड्रामा, राऊतांसोबत बोलता बोलता देसाई म्हस्केंकडे गेले; पुढे काय घडलं? VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT