Snake Bite Saam tv
मुंबई/पुणे

Baramati News: ३० हून अधिक वर्षे सापांना जीवदान दिलं, सर्पदंशानंच घात झाला; सर्पमित्राचा मृत्यू

Snake News: ३० हून अधिक वर्षे सापांना जीवदान दिलं, सर्पदंशानंच घात झाला; सर्पमित्राचा मृत्यू

मंगेश कचरे

Baramati News: बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथे एक दुःखद घटना घडली आहे. येथील सर्पमित्राचा विषारी नाग चावल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

हजारो सर्पांना जीवदान देणाऱ्या सर्पमित्राचा मृत्यू नाग चावल्याने झाला असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोणी भापकर येथील सर्पमित्र विजय छबुराव यादव हे १५ ऑगस्ट रोजी सर्प पकडण्यासाठी सुपा नजीक खराडवाडी येथे गेले होते.

येथेच विषारी नागाने त्यांना दंश केला होता. जनावरांसाठी बनवलेल्या मुरघासाच्या खड्ड्यात नाग पकडण्यासाठी गेले असताना त्यांना हा विषारी नागाने दंश केला होता.

जखमी अवस्थेतही त्यांनी विषारी नागास मोकाळ्या रानांत सोडून दिले होते. १६ ऑगस्ट रोजी त्याची प्रकृती धोक्यातून बाहेर आली होती. मात्र आज अखेर मृत्यूशी झुंज देत असताना त्यांची प्राणज्योत मावळली.

गेल्या तीस पेक्षा अधीक वर्षापासून ते सर्पमित्र म्हणून शेतकरी व गावोगावी संलग्न झाले होते. शेतकरी अथवा इतरत्र कोणाकडूनही पैसे न घेता सापास जीवदान देण्याचे काम त्यांनी अखेरपर्यंत केले. त्यांच्या मृत्यूमुळे शेतकरी वर्गाकडून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT