बारामती शेरेवाडी दुहेरी हत्याकांड
झोपेत दोन महिलांची निर्घृण हत्या
चाकूने वार करत जागीच संपवलं
बारामती पोलिसांकडून घटनेचा शोध सुरू
बारामती दुहेरी हत्याकांडाने हादरली. बारामतीमध्ये दोन महिलांची निर्घृण हत्या करण्यात आली. रात्री झोपेत असताना या महिलांवर चाकूने वार करत जागीच संपवण्यात आले. बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच बारामती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांनी दोन्ही महिलांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. पोलिस सद्या तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे मध्यरात्री दोन महिलांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. कृष्णाबाई लडकत आणि इंदुमती लडकत अशी हत्या झालेल्या महिलांची नावे आहेत. या दुहेरी हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
कृष्णाबाई लडकत आणि इंदुमती लडकत या दोघी घरामध्ये झोपेत असताना त्यांची हत्या करण्यात आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्यांचे मृतदेह आढळून आले. घराच्या आतील दृश्य पाहून सर्वजण घाबरले. घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. हत्या करून आरोपी फरार झाला आहे. या हत्येमागील कारण तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.